अमीह हमजा या दहशतवाद्यावर लाहोरमध्ये गोळीबार
लष्कर-ए-तोएबाचा तो दहशतवादी आहे
गोळीबारात तो जखमी झाला असून उपचार सुरू
दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला
पाकिस्तानातील लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कर-ए-तोएबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा अत्यंत जवळचा सहकारी अमीर हमजावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लाहोरमधील एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. हमजा हा केवळ लष्कर ए तोएबाचा जुना सदस्यच नव्हता, तर संघटनेसाठी निधी गोळा करणे आणि तरुणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादाकडे वळवण्यात त्याचा मोठा वाटा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजताच्या सुमारास पाकिस्तानच्या लाहोरमध्ये कारमध्ये बसलेल्या लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक आणि दहशतवादी अमीर हमजा याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या. लाहोरच्या पैको रोडवरील पिंडी स्टॉपवर ही घटना घडली. या व्यक्तीने अमीर हमजाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार गेला. हा गोळीबार तेव्हा करण्यात आला जेव्हा अमीर हमजा स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला होता. या हल्ल्यात अमीर हमजाच्या हाताला दोन गोळ्या लागल्या आहेत.
या गोळीबारात अमीर हमजा थोडक्यात बचावला. त्याच्या उजव्या हाताला गोळी लागली असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर अमीर हमजाला लाहोर पोलिसांच्या संरक्षणाखाली घरी पाठवण्यात आले. या गोळीबाराच्या वेळी निवृत्त पाकिस्तानी न्यायाधीश नझीर अहमद हे देखील अमीर हमजासोबत त्याच्या कारमध्ये बसले होते. पण ते सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
या हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोएबाची राजकीय शाखा असलेल्या पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने अमीर हमजाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि दावा केली की, गोळीबारात जखमी झालेल्या हमजावर प्रथमोपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. लाहोर पोलिसांनी अद्याप अमीर हमजाच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली नाही. पण या गोळीबाराच्या घटनेमुळे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खळबळ उडाली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.