Imran Khan  Saam Tv
देश विदेश

Pakistan News: पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांना १० वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

Imran Khan : मे महिन्यात झालेल्या हिंसात्मक घटना आणि गोपनीय राजनैतिक कागदपत्रांचा खुलासा केल्याप्रकरणी इमरान खान आणि इतर अन्य महत्त्वाच्या नेत्याविरोधात कारवाई करण्यात आलीय.

Bharat Jadhav

Ex-Pak Pm Imran Khan Sentenced:

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणीत वाढ झालीय. पाकिस्तानच्या न्यायालयाने सिफर प्रकरणात इमरान खान आणि त्याच्या सरकारमधील परराष्ट्र मंत्र्याला १० वर्षाची शिक्षा सुनावलीय.(Latest News)

गोपनीयता उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या न्यायालायाने माजी पंतप्रधान (Prime Minister) इमरान खान (Imran Khan) यांना १० वर्षांची शिक्षा सुनावलीय. इमरान खानसह माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही स्टेट सीक्रेट उघड केल्याप्रकरणी १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय. पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनी आणि पीटीआयच्या प्रवक्त्याने सरकारी दस्तऐवज लीक केल्याप्रकरणी दोघांना शिक्षा सुनवण्यात आल्याची पुष्टी केलीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही शिक्षा 'सिफर' प्रकरणी गोपनीय राजनैतिक दस्तऐवज उघड करण्याच्या संबंधित आहे. या प्रकरणात अडकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कारस्थान होत असल्याचं इमरान खान म्हणाले होते. इमरान खान यांनी २७ मार्च २०२२ रोजी एका जाहीर सभेत या कारस्थानामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला होता. अमेरिकेने त्यांचे सरकार पाडण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय षड्यंत्र' रचल्याचा दावा इमरान खान यांनी केला होता.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP)पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)पक्षाच्या निधीच्या अनेक वर्षांच्या तपासानंतर, ऑगस्ट २००३ मध्ये पक्षाला 'निषिद्ध निधी' मिळाल्याचं म्हटलं होतं. इस्लामाबादमध्ये ९ मे २०२३ रोजी अर्धसैनिक रेंजर्सने इमरान खान यांना अटक केली होती. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इमरान खान यांची अटक करण्यात आली होती.

इमरान खान यांची अटक झाल्यानंतर येथे हिंसक आंदोलन झाली होती. यात रावळपिंडीमधील लष्कर मुख्यालयासह २० पेक्षा अधिक सैन्य संस्था आणि राज्य भवनाचे नुकसान झालं होतं.या ठिकाणांना आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT