Pakistan Shooting/Social Media Saam TV
देश विदेश

Pakistan Shooting : पाकिस्तानमध्ये शाळेवर हल्ला, स्टाफ रूममध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार; ७ शिक्षकांची निर्घृण हत्या

पाकिस्तानमध्ये एका शाळेवर हल्लेखोरांनी हल्ला केलाय. एका शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार करत सात शिक्षकांची निर्घृण हत्या केली.

Nandkumar Joshi

Pakistan Firing : पाकिस्तानमध्ये एका शाळेवर हल्लेखोरांनी हल्ला केलाय. हल्लेखोरांनी गुरुवारी एका शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार करत सात शिक्षकांची निर्घृण हत्या केली. खैबर पख्तुनख्वा येथील पाराचिनार परिसरात ही धक्कादायक घटना घडली. काही शस्त्रधारी लोक शाळेच्या स्टाफ रूममध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. (Latest Marathi News)

रिपोर्टनुसार, शाळेमध्ये हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सात शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप या हल्ल्याची कोणत्याच संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. शिक्षकांच्या हत्येची घटना ही दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यातील दोषींना सर्वांसमोर आणावे, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानमध्ये अलीकडेच दहशतवादी हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हल्ल्याच्या घटना वाढल्यात. गेल्या वर्षी नोव्हेंबरनंतर अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत.

रिपोर्टनुसार, २०१८ नंतर जानेवारी २०२३ मध्ये सर्वाधिक हल्ल्याच्या घटना घडल्यात. या हल्ल्यांमध्ये १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अडीचशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. अलीकडेच पाकिस्तानच्या लक्की मारवत जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT