Pakistan Currency Notes Saama Tv
देश विदेश

Pakistan New Currency Notes: पाकिस्तानमध्ये नोटबंदी; नवीन नोटा छापण्याचे आदेश

Pakistan Currency Notes: पाकिस्तान आर्थिक संकटाशी झुंजत आहे आणि एकप्रकारे देशाची अर्थव्यवस्था आयएमएफसारख्या संस्थेच्या दयेवर चालत आहे. याचदरम्यान स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

Demonetization In Pakistan:

पाकिस्तान अर्थव्यवस्था कमकूवत झाली आहे. याचदरम्यान पाकिस्तानच्या सरकारने नोटबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानमधील जुन्या नोटा रद्द करत नवीन नोटा छापण्याचा निर्णय स्टेट बँक पाकिस्तानने घेतलाय. पाकिस्तान आता २० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंतची नोट बदलणार आहे. बनवाट नोटांना आळा घालण्यासाठी पाकिस्तान सरकार जुन्या नोटा चलनातून बाद करणार आहेत.(Latest News)

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी याविषयीची माहिती देताना सांगितलं की, नवीन नोटा तयार करताना विशेष काळजी घेतली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनुसार या नोटांमध्ये अॅडव्हान्स सिक्योरिटी फीचर्स जोडण्यात येणार आहेत. करन्सी सिस्टमला आधुनिक करण्यासाठी डिझाइनला अपडेट करण्यात आल्याचं गव्हर्नर यांनी माध्यमांना सांगितलं. नोटबंदीचा निर्णय पाकिस्तानच्या चलन प्रणाली, व्यापार आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी घेण्यात आलाय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन नोटांना जुन्या नोटांच्या जागी हळू-हळू आणल्या जातील. एसबीपी (state bank of Pakistan) २००५ पासून बँक नोट जारी करत आहे. याची सुरुवात २० रुपयांपासून होते, त्यानंतर ५० रुपये, १०० रुपये, रुपये ५००, रुपये १००० आणि रुपये ५००० या नोट नवीन फीचर्ससह जारी करण्यात येणार असल्याची माहिती एसबीपीच्या गव्हर्नर यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT