पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीयाची हत्या Saam Tv
देश विदेश

पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीयाची हत्या

पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर एका भारतीय मच्छिमाराची हत्या करण्यात आली

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर एका भारतीय मच्छिमाराची हत्या करण्यात आली आहे. गुजरात मधील द्वारका याठिकाणील ओखा शहराजवळच ‘जलपरी’ नावाच्या बोटीवर पाकिस्तानी मरीनने गोळीबार केला आहे. या गोळीबारात श्रीधर नावाच्या एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून, १ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

हे देखील पहा-

मार्चमध्ये पण पाकिस्तानने ११ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या २ बोटी जप्त करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये देखील, पाकिस्तानने १७ भारतीय मच्छिमारांना देशाच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या ३ बोटी ताब्यात घेतले आहेत. गुजरात राज्यातील जलपरी ह्या बोटीवर पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे(वय- 32 वर्ष) हा तरुण जागीच ठार झाला असून बोटीचा तांडेल (कॅप्टन) जखमी झाल्याची घटना घडली आहे.

श्रीधर हा मागील ३ महिन्यापासून गुजरात राज्यातील वनगबारा येथील जयंतीभाई याच्या जलपरी बोटीत खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. त्यांची बोट मासेमारी करता- करता ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात मासेमारी करत असताना पाकिस्तान ट्रॉलर्स मधून आलेल्या सैनिकांनी भारतीय मच्छीमारावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर ह्याला ३ गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून बोटीच्या तांडेल याना एक गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बोट मालक जयंतीभाई यांनी आपणास सांगितल्याचे वडराई मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन माणेंद्र आरेकर यांनी दिली आहे. शवविच्छेदन करण्यासाठी त्याचे शव रुग्णालयात नेण्यात आल्याचेही बोट मालकांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: 50 टक्के कर्ज वितरित करू हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेला ठराव नियमबाह्य - चंद्रशेखर बावनकुळे

Tuesday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार; 5 राशींच्या व्यक्तींचे अडथळे कायमचे दूर होणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT