India Pakistan Tensions 
देश विदेश

India Pakistan Tensions : युद्धाशिवाय पर्याय नाही, पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल

Khawaja Asif war threat : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असताना पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Pakistan Minister Threatens India: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्तीवर वारंवार ड्रोन हल्ले केले जात आहेत. भारताकडून पाकड्यांचे हल्ले हाणून पाडले जात आहेत. दोन्ही देशामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली असतानाच पाकिस्तानच्या नेत्याने पुन्हा एकदा धमकी दिली आहे. युद्धाशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलेय. स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आम्ही शांततेचे प्रयत्न केला, पण भारताच्या हल्ल्यांमुळे आता युद्ध अटळ आहे, असे वक्तव्य आसिफ यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ नष्ट केले. त्यानंतर बावचाळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती निर्माण झाली. भारताच्या सिंदूर ऑपरेशननंतर आसिफने युद्धाची धमकी दिली. डिजिटल-365 न्यूजशी बोलताना त्याने युद्धाशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. मागील चार दिवसांत भारताने सातत्याने हल्ले केले. आता युद्ध हाच एकमेव पर्याय आहे. तणाव कमी करण्याचे प्रयत्न थांबले आहेत. पुढील निर्णय पाकिस्तानी सैन्य घेईल, असे आसिफ म्हणाला. दरम्यान यापूर्वीही आसिफ याने भारताला परमाणु युद्धाची धमकी दिली होती.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाला सुरूवात २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाली. या भ्याड हल्ल्यात भारताच्या २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारताने पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ नष्ट केले. भारताच्या या हल्ल्यात १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (LoC) सातत्याने गोळीबार केला. पाकड्यांच्या नापाक हरकतीमध्ये काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने ड्रोन आणि हवाई हल्ल्यांचाही प्रयत्न केला, पण भारताच्या S-400 हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT