Karanataka CM Saam
देश विदेश

Siddaramaiah: सीएमच्या विधानाची थेट पाकिस्तानी मीडियात हेडलाईन; भाजपने उडवली खिल्ली, म्हणाले 'पाकिस्तान रत्न द्या'..

Siddaramaiahs War Remarks Spark Controversy BJP Hits Back: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अलीकडेच पाकिस्तानसोबत युद्ध करण्याच्या विरोधात विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पाकिस्तानी माध्यमांनी हेडलाईन तयार केली.

Bhagyashree Kamble

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अलीकडेच पाकिस्तानसोबत युद्ध करण्याच्या विरोधात विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पाकिस्तानी माध्यमांनी हेडलाईन तयार केली. त्यानंतर सिद्धरामय्यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना "पाकिस्तान रत्न" असं म्हणत खिल्ली उडवली.

सिद्धरामय्या यांनी ट्विटरवर लिहिलं, "युद्धाबाबतच्या माझ्या विधानावर समर्थन आणि विरोधात अनेक चर्चा आणि वाद झाले. युद्ध नेहमीच राष्ट्राचा शेवटचा पर्याय असावा. पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या भयानक हल्ल्यामुळे आपल्या गुप्तचर आणि सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. सरकारने या त्रुटी दूर करून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत असलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याचा फायदा घेत पाकिस्तानला असा धडा शिकवायला हवा की त्यांनी पुन्हा कधीही अशा कृत्याचा प्रयत्न करु नये."

सिद्धरामय्यांचे विधान पाकिस्तानी मीडियात हेडलाईन का बनली?

यापूर्वी सिद्धरामय्या यांनी "पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याची गरज नाही" असे म्हणत वाद निर्माण केला होता. त्यांनी म्हटले होते, "कठोर सुरक्षा उपाययोजना राबवायला हव्यात. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. देशात शांतता नांदली पाहिजे आणि लोकांना सुरक्षिततेची भावना मिळाली पाहिजे. केंद्र सरकारने प्रभावी सुरक्षा यंत्रणा सुनिश्चित करावी." त्यांच्या या विधानानंतर, पाकिस्तानी माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचे कव्हरेज करत त्यांना "भारतातील युद्धविरोधी आवाज" असे म्हटले.

भाजपकडून जोरदार टीका

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सिद्धरामय्या यांना "पाकिस्तान रत्न" असं म्हणत खिल्ली उडवली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आपल्या बालिश आणि हास्यास्पद विधानांमुळे तुम्ही एका रात्रीत पाकिस्तानात प्रसिद्ध झाले आहात."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT