Maryam Nawaz Google
देश विदेश

Pakistan: पाकिस्तानमध्ये घडला इतिहास, माजी पंतप्रधानांची मुलगी बनली पहिली महिला मुख्यमंत्री

Latest Political News: पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी महिला नेत्याची निवड झाली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीने इतिहास रचला आहे.

Rohini Gudaghe

Punjab First Female CM Maryam Nawaz

पाकिस्तानचे (Pakistan) माजी मुख्यमंत्री नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. मरियम नवाज यांनी इतिहास रचला आहे, कारण मरियम नवाज पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. (Latest Political News)

मरियम नवाज यांना 220 मते मिळाली होती. त्यांनी सुन्नी इत्तेहाद परिषदेचे उमेदवार राणा आफताब अहमद यांचा पराभव केला. सुन्नी इत्तेहाद परिषदेच्या सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला (Punjab First Female CM) होता. त्यामुळे राणा आफताब अहमद यांना एकही मत मिळालं नाही. त्यामुळे मरियम नवाज यांचा विजय झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच महिला मुख्यमंत्री

संख्याबळानुसार मरियम नवाज पंजाबच्या मुख्यमंत्री बनणे निश्चित होते. पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, मतदान फक्त मुख्यमंत्रीपदासाठी होणार आहे. विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला बोलण्याची संधी दिली जाणार (Latest Political News) नाही. यानंतर झालेल्या मतदानात मरियम नवाज सहज विजयी झाल्या आहेत. तत्पूर्वी, पंजाब विधानसभेच्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

या शपथविधी सोहळ्यामध्ये 371 पैकी 321 सदस्यांनी शपथ घेतली. पंजाब विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन विजयी झाला. पीएमएल-एनचे मलिक मोहम्मद अहमद खान यांची स्पीकर म्हणून निवड झाली आणि त्यांना 224 मते मिळाली. तर मलिक जहीर चनेर यांची उपसभापतीपदी निवड झाली, त्यांना 220 मते मिळाली

मुख्यमंत्रीपदी मरियम नवाज यांची निवड

मरियम नवाज (Maryam Nawaz) या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत. मरियम नवाजने 1992 मध्ये सफदर अवानशी लग्न केलं होतं. सफदर अवान हे पाकिस्तानी लष्करात कॅप्टन राहिले आहेत. सफदर अवान हे नवाझ शरीफ यांचे सुरक्षा अधिकारीही होते. मरियम नवाज यांना तीन मुले आहेत.

मरियम नवाजने २०१२ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर राजकारणात वडिलांसोबत काम केलं. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मरियम नवाज पहिल्यांदाच पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली आणि पंजाब असेंब्लीसाठी निवडून आल्या (CM Maryam Nawaz) आहेत. यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT