Shilpa Bodkhe Joined Shinde Group
Shilpa Bodkhe Joined Shinde GroupSaamtv

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश

Shilpa Bodkhe Joined Shinde Group: मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा. बोडखे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Politics:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा. बोडखे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विदर्भात शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्य पोहचवण्याचे काम आजवर प्रा. शिल्पा बोडखे आपल्या पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे करत होत्या. मात्र उबाठा गटात वारंवार अपमान गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता.

त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना प्रा. बोडखे यांनी यापुढेही त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि राज्य सरकारचे काम आणि पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shilpa Bodkhe Joined Shinde Group
Mahesh gaikwad : उल्हासनगरमधील गोळीबारातून बचावलेल्या महेश गायकवाडांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी

माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र! माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी (Aditya Thackeray) यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे," असे पत्र लिहित शिल्पा बोडखे यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. (Latest Marathi News)

Shilpa Bodkhe Joined Shinde Group
Navapur Accident : लग्न आटोपून घरी परतताना भीषण अपघात; नऊ जण जखमी, जखमीत पोलिसांचाही समावेश 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com