Imran Khan Arrest Update Saam TV
देश विदेश

Imran Khan Arrested: पाकिस्तानात गृहयुद्ध, इम्रान खान यांच्या अटकेनंतर भडकली हिंसा

Imran Khan Arrest Updates: पाकिस्तानात गृहयुद्ध, इम्रान खान यांच्या अटकेनंतर भडकली हिंसा

Satish Kengar

Imran Khan Arrested: पाकिस्तानमध्ये मंगळवारी देशाचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्नान खान यांना अटक करण्यात आली. इम्रान खानला अल कादिर ट्रस्ट प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना अटक करण्यासाठी पाकिस्तान रेंजर्सचे पथक इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात पोहोचले होते.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात पाकिस्तानात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी इम्रान समर्थकांनी जाळपोळ सुरु केली आहे. यातच इम्रान खानच्या समर्थकांनी रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात घुसून हिंसाचार केल्याची माहिती समोर येत आहे. (Pakistan News)

तत्पूर्वी पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयाच्या गेटमध्ये प्रवेश करण्याआधीच रेंजर्सनी कोर्ट परिसरातून इम्रान यांना ताब्यात घेतले. पीटीआयचे वकील फैसल चौधरी यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे. पाकिस्तानातील स्थानिक वृत्तपत्र डॉन डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

पीटीआयचे अझहर मशवानी यांनी इम्रान यांना रेंजर्सनी कोर्टाच्या आतून अपहरण केले असा आरोप केला आहे. या घटनेनंतर पीटीआयकडून देशभरात कार्यकर्त्यांना तात्काळ निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पीटीआयचे सरचिटणीस असद उमर यांना अटक

दरम्यान, इस्लामाबाद पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पीटीआयचे सरचिटणीस असद उमर यांना अटक केली. जिओ न्यूजनुसार, उमर यांना आयएचसी बार असोसिएशनच्या कार्यालयाबाहेरून अटक करण्यात आली. जिथे ते आयएचसीमध्ये याचिका दाखल करण्याच्या तयारीत होते. खान यांना भेटण्याची ते विनंती करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Maharashtra Politics: ठाण्यापाठोपाठ कोकणातही महायुतीत वाद? वर्चस्वाचं राजकारण, भगव्या शालीचं कारण?

Maharashtra Rain: राज्यात पुढचे ४ दिवस कोसळधार, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट? वाचा हवामान खात्याचा अंदाज

OTT Releases: 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ते 'द ट्रायल २'; या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार हे धमाकेदार चित्रपट आणि सीरिज

Dhananjay Munde: राजकीय कमबॅक की समाजाला न्याय? बंजारा आरक्षणावर धनंजय मुंडेंचं राजकारण?

SCROLL FOR NEXT