Pakistani Gen Z youth launch ‘Mission Noor’ protest, giving six-day ultimatum to topple Shahbaz Sharif and Army Chief Asim Munir. Saam Tv
देश विदेश

Pakistan Protest: जेन झी मैदानात पाकिस्तानात सत्तापालट? नेपाळनंतर पाकमध्येही तरुणाई आक्रमक

Gen Z Pakistan: नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलनामुळे सरकार कोसळलं.आता तशीच स्थिती पाकिस्तानात होऊ घातली आहे. त्यासाठी आठ कोटी जेन झी एकवटले आहेत.. पाहूया पाकिस्तानमधील तरुणाईने सरकार आणि लष्कराला काय इशारा दिलाय.

Girish Nikam

ऐकलंत....पाकमधील या तरुणाने पाकिस्तानमधील सर्व प्रांतातल्या लोकांना 20 सप्टेंबरला अजान देण्याचं आवाहन केलंय. अशा आवाहनाचे अनेक व्हिडीओ पाकच्या सोशल मीडियावर धुमाकळ घालतायेत.... तरुणाई रस्त्यावर उतरली...आक्रमक झाली तर काय होतं हे नेपाळच्या निमित्ताने संपूर्ण जगानं पाहिलंय. आता पाकिस्तानातही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या विरोधात आठ कोटी जेन झी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी त्यांनी 'मिशन नूर' सुरू केलं असून सत्ताधाऱ्यांना थेट सहा दिवसांचा अल्टिमेटम दिलाय.

नेपाळ आणि फ्रान्सपासून धडा घेत पाकिस्तानने लष्करप्रमुख मुनीर आणि मंडळींना उखडून टाकण्यासाठी आक्रमक झाले आहेत पाकिस्तानमध्ये क्रूर शासक असल्याचा आरोप करत सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे. ज्याला 'मिशन नूर' असे नाव देण्यात आले आहे. येत्या 20 सप्टेंबरला रात्री 9 वाजता सर्वांनी आपल्या घराच्या छतावर जाऊन मोठ्या आवाजात अजान द्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. यावेळी तुम्ही मास्क लावून तुमचा चेहरा लपवू शकता, अशी सुचनाही करण्यात आली आहे.

मिशन नूरमधून केलेल्या या सामुहिक अजानच्या आवाहनाचा

पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. एकीकडे बलुचिस्तानने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आहे. गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात देखील पाकिस्तानविरोधातलं वातावरण आहे, अशा परिस्थितीत तरुणाईचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. आधीच पाक पूर्णपणे कंगाल झाला आहे. सरकार आणि लष्करप्रमुख मुनीरच्या कारस्थानांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे तिथल्या तरुणाईचा असंतोष कधी आणि कुठल्या स्वरूपात बाहेर येईल आणि पाकिस्तानची किती शकलं होतील हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : धक्कादायक प्रकार; अकोला शासकीय रुग्णालय आवारातील लॉनवर अश्लील चाळे

दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं, १० तोळं सोन्यासाठी किती मोजावे लागणार? पाहा लेटेस्ट दर

Shocking: इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून २ मित्रांनी उडी मारली, सामूहिक आत्महत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, दुपारी फडणवीस करणार मोठी घोषणा?

Ahaan Panday : 'सैयारा'नंतर अहान पांडेला मोठ्या चित्रपटाची लॉटरी, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स?

SCROLL FOR NEXT