Pakistan Former PM Imran Khan arrested saam tv
देश विदेश

Former Pakistan PM Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना होणार मृत्यूदंडाची शिक्षा? काय आहे प्रकरण?

Former Pakistan PM Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

Vishal Gangurde

Ex-Pakistan PM Imran Khan charged in cipher case:

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाकिस्तानमधील एका विशेष कोर्टाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मृत्यूदंडाला सामोरे जावे लागू शकते. (Latest Marathi News)

'लाईव्ह हिंदूस्थान'च्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील एका विशेष कोर्टात सायफर आणि गुप्तता कायदा उल्लंघन प्रकरणी आज सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना दोषी ठरवण्यात आले. या आरोपानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा ते मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते असं बोललं जात आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष कोर्टात त्यांच्यावर कारवाई करण्यास २७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्या दिवशी साक्षीदारांना हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणावर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे विशेष वकील शाह खावर म्हणाले, आजच्या सुनावणीत आरोप सिद्ध होणार होते. त्यामुळे कोर्टात दोषारोपाचे वाचन करण्यात आले. आरोप जाहीर करताना पीटीआयचे दोन्ही नेते उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील कार्यवाही २७ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे'.

दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वकील उमैर नियाझी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. 'माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी गुन्हा नाकारला आहे. कोर्टाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले जाणार आहे, अशी माहिती वकील उमैर नियाझी यांनी दिली.

इम्रान खान यांचे वकील उमैर नियाझी यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी गुन्हा नाकारला आहे. न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'विकासकामांचा असली पिक्चर अभी बाकी है', नितीन गडकरी

Curry leaves chutney: कढीपत्त्याची 'ही' चटणी वाढावेल जेवणाची चव

IND vs NZ 2nd Test: सँटनरची 'सुंदर' गोलंदाजी! 7 विकेट्स घेत टीम इंडियाला केलं All Out; न्यूझीलंडकडे मोठी आघाडी

Indrayani: इंदू आणि फंट्या गँगने बनवला मातीचा किल्ला, 'इंद्रायणी' मालिकेत साजरी होणार अनोखी दिवाळी

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

SCROLL FOR NEXT