पाकिस्तानचा डाव पुन्हा फसला; स्फोटकं वाहून नेणारे ड्रोन पोलिसांनी पाडले Twitter/@ANI
देश विदेश

पाकिस्तानचा डाव पुन्हा फसला; स्फोटकं वाहून नेणारे ड्रोन पोलिसांनी पाडले

भारतीय सीमेपासून ५ किलोमीटर अंतरावर या ड्रोनला पाडण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने पुन्हा एकदा भारताच्या सीमेवर ड्रोनने दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावला आहे.जम्मू-काश्मीरच्या Jammu kashmir कनाचल भागातील पोलिसांनी Police एक ड्रोन पाडले आहे. ड्रोनला Drone विस्फोटक सह भारतीय सीमे मध्ये पाठवण्यात आले होते असे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या एअरफोर्स Airforce स्टेशनवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होऊन एक महिना देखील पूर्ण झालेला नसून त्यात आता आणखी एक ड्रोन भारतीय सीमवर पाठवण्यात आला आहे. या ड्रोनला पोलिसांनी पाडले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले की कनाचक भागात एक ड्रोन पाडण्यात आले आहे. या ड्रोनसोबत काही विस्फोटके देखील आढळून आले आहेत. भारतीय सीमेपासून ५ किलोमीटर अंतरावर या ड्रोनला पाडण्यात आले आहे. या ड्रोन सोबत पाच किलोचे विस्फोटक होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

हे देखील पहा -

जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळावर 27 जूनला ड्रोन हल्ला झाला होता. तेव्हापासून काही ठिकाणी सारखेच ड्रोन दिसत आहेत. सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचेच हे नेहमी कृत्य असल्याचे संशय आहे. ते हल्ल्यासाठी कायम ड्रोनचा वापर करत असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.

शांत राहून विध्वंस घडवून, आणण्याचे तंत्र दहशतवाद्यांच्या हाती आल्याने आणि भारतामध्ये त्याचा वापर होऊ लागल्यामुळे ही एक धोक्याची पातळी निर्माण झाली आहे. त्याचा सामना करण्यासाठी तांत्रिक सुसज्जता महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यामधील सोपोरच्या वारपोरा गावात मध्ये रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चांगलीच चकमक झाली आहे.

या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर- ए- तयब्याचे अतिरेकी आहेत. पोलिसांनी यासंदर्भामध्ये माहिती दिली आहे. मरणाऱ्यामध्ये एका टॉप कमांडरचा यामध्ये समावेश आहे. सुरक्षा बलांना घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा देखील सापडला आहे. तसेच अनेक आक्षेपार्ह वस्तू यामध्ये आढळले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT