Pakistan fake news saam tv
देश विदेश

Operation Sindoor: डॉननंच केली पाकची पोलखोल,पंतप्रधान शरीफ पडले तोंडघशी, खोटारडेपणाची फॅक्टरी डॉनकडून उघड

Pakistan Exposed by Its Own: बड्या बड्या बाता मारणारे पाकिस्तानी नेते आता तोंडघशी पडलेत... भारतानं नाही तर चक्कं पाकिस्तानी मीडियानेच पाकिस्तानच्या खोटारडेपणाची फॅक्टरी उघड केलीय... पाकिस्तानच्या डॉन या मीडियानं नेमकं काय सत्य मांडलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Omkar Sonawane

हे आहेत ऑपरेशन सिंदूरचे धमाके.... भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून डागलेले मिसाईल ओसाड माळावर डागले नव्हते... तर ते डागले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानी एअरबेसवर.....मात्र पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी तर खोटारडेपणाची फॅक्टरीच उघडलीय...

हा फोटो नीट पाहा... पाकिस्तानच्या हवाई दलाच्या शौर्याचं टेलिग्राफनं कौतूक केलंय, असं तुम्हाला वाटेल... पण हा फोटोच एआय नं एडिट केलेला आहे....

हे पाहा द डेली टेलिग्राफचं ओरिजनल फ्रंट पेज..... झालात ना चकित... अशीच धुळफेक पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि उप पंतप्रधान इशाक डार यांनी केलीय....मात्र त्याचा पर्दाफाश पाकिस्तानमधील डॉन या आघाडीच्या मीडियानं केलाय..

भारतानं उद्ध्वस्त केलेलं तोयबा मरकज.... हेच ते लष्कर ए तोयबाचा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा अड्डा.... मात्र तोच भारतानं उडवून दिलाय... त्याचे पुरावेच पाकिस्तानी मीडिया डॉनच्या पत्रकारानं समोर आणलंय....त्यामुळं खोटं बोलून तोंडघशी पडण्याचा पाकिस्तानी नेत्यांचा इतिहास पुन्हा उघड झालाय.. आता तरी पाकिस्तानी नेत्यांनी स्वतःची स्वतःला लाज वाटून खरं बोलायला शिकलं पाहिजे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT