Violent protests erupt across Pakistan following the killing of Iran’s Supreme Leader amid escalating Middle East conflict. Saam Tv
देश विदेश

खामेनींईंचा खात्मा, पाकिस्तानात पेटलं, कराचीपासून PoK पर्यंत आगच आग

Pakistan Violence After Khamenei Killing: इस्त्रायल-अमेरिकेचा इराणवरील हल्ला आता पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू लागलाय.. खामेनींईंच्या हत्येनंतर जगात युद्ध पेटलेले असतांना पाक दोन्ही बाजूनं कसं हतबल झालाय.

Saam Tv

इराणमध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये दंगल उसळलीय..पाकिस्तानातील रस्त्यांरस्त्यावर मोहल्ल्यांमोहल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी अक्षरशः धिंगाणा घालायला सुरुवात केलीये. याआंदोलनाचं नेतृत्व शिया मुस्लिम करत असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसतंय. कराचीतील अमेरिकन दूतावास आणि इस्लामाबादमधील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालय या हिंसक जमावानं फोडून टाकलंय. तर पाकिस्तानमधील महत्वाचे रस्ते अडवून चक्काजाम केलाय.

पाकिस्तानी पोलिसांचा पाकिस्तानींवरच गोळीबार

अमेरिका-इस्त्रायल विरोधात शिया मुस्लिम रस्त्यावर

धर्माच्या आगीत पुन्हा होरपळला पाकिस्तान

आधीच संकटात असलेल्या पाकिस्तानला मध्य-पूर्वेतील य़ुद्धानं नव्या संकटात टाकलंय.. अमेरिकेनं सातत्यानं पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत पुरवत पोसलंय. त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूनं उभा आहे हे पाकिस्तानातील शिया मुस्लिमांनाही माहितीये. म्हणूनच खामेनींच्या हत्त्येनंतर पाकमधील शिया मुस्लिम आपल्याच सरकार विरोधात आक्रमक होत हिंसका आंदोलनं करु लागलेत.

पाकिस्तानात 10 ते 15 टक्के शिया मुस्लिम

शिया मुस्लिमांचा पाकिस्तानात धार्मिक दबदबा

कराची, लाहोर आणि पेशावर प्रांत शियाबहुल

खामेनींच्या हत्येनंतर जगात युद्ध पेटलेले असतांना पाक दोन्ही बाजूनं हतबल झालाय. एकीकडे शेजारील तालिबाननं पाकचं कबरडं मोडलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानातील शिया समाजानं पाक मध्ये गृहयुद्ध पुकारलंय. त्यामुळे जगात नाचक्की झालेल्या पाक सरकारला आता आपल्याच नागरिकांवर गोळ्या झाडण्याची वेळ आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमेन पोलिसांच्या ताब्यात

पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग, राज्य सरकारने १२०० कोटींच्या प्रकल्पाला दिली मंजुरी, कुठून जाणार हायवे?

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Khana Saree Dress: खणाच्या साडीपासून शिवा हे ७ ट्रेंडी ड्रेस उन्हाळ्यात लग्नसराई किंवा कार्यक्रमांसाठी आहे बेस्ट चॉईस

Monsoon Update : आनंदवार्ता! 'या' तारखेला मान्सून केरळमध्ये होणार दाखल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT