Punjab Chief Minister Maryam Nawaz at a public event amid controversy over ₹4 crore government-funded makeup expense. Saam Tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी 4 कोटींचा निधी, सरकारी पैशातून मेकअप

Maryam Nawaz Makeup Fund: एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कर्जावरून आपल्या देशाचं दु:ख जगासमोर मांडलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानतल्या नेत्यांनी मात्र यातून कोणताच धडा घेतलेला दिसून येत नाही. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी चक्क 4 कोटींचा शासकीय निधी मंजूर करण्यात आलाय. कोण आहेत या महिला मुख्यमंत्री, काय आहे हा सगळा प्रकार,

Omkar Sonawane

पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहाबाज शरीफ कर्जावरून चिंतेत आहेत. झोळी पसरायला लाज वाटते असं सांगतायेत. पण दुसरीकडे पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी तर कहरच केलाय. त्यांच्या मेकअपसाठी सरकारने तब्बल 4 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केलाय. एकीकडे सामान्य जनता जिवनावश्यक वस्तूंसाठी झगडताना दिसतीय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सौंदर्यावर होणाऱ्या या उधळपट्टीमुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळलीय.

मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी 4 कोटी?

पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मेकअपच्या खर्चासाठी पंजाब सरकारच्या कॅबिनेट सचिवांनी 12 जानेवारी रोजी एक अत्यंत गोपनीय आदेश जारी केला होता. या आदेशानुसार, मुख्यमंत्री मरियम नवाज आणि माहिती मंत्री आझम जाहीद बुखारी यांचा मेकअप तसच बैठका आणि जाहीर सभांमध्ये स्वतःला व्यवस्थित सादर करण्यासाठी 4 कोटी रुपयांचं विशेष अनुदान मंजूर करण्यात आलय.

पाकिस्तानी राजकारणात, मरियम नवाज शरीफ केवळ त्यांच्या दमदार आवाजासाठीच नव्हे तर त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी देखील ओळखल्या जातात. मरियम नवाज यांचा लूक त्यांच्या सुंदरतेमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असतो. मरियम नवाज यांची ही पहिलीच उधळपट्टी नाही. यापूर्वी त्यांच्या सरकारी गाडीचे टायर बदलण्यासाठी 1 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केल्याचं प्रकरण चर्चेत होतं. त्यानंतर आता या मेकअपनिधीमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सध्या पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठलाय़.

अशा भीषण परिस्थितीत सरकारी पैशानं स्वतःचे सौंदर्य खुलवणे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. सरकारच्या या कृतीमुळे पाकिस्तानातली जनता रस्त्यावर उतरू शकते. याठिकाणी नेपाळसारखं आंदोलन पेटू शकतं. त्यामुळे पंजाब सरकार आता या गोपनीय खर्चावर काय निर्णय घेतं? मरियम यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी हे 4 कोटी दिले जाणार की सरकार हा निर्णय मागे घेणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT