Pakistan and Afghanistan announce a 48-hour ceasefire following a deadly Kandahar airstrike that killed 15 people. saam tv
देश विदेश

Pakistan-Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांची युद्धबंदी,आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

Pakistan and Afghanista Ceasefire: सीमा संघर्ष वाढल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने ४८ तासांच्या तात्पुरत्या युद्धबंदीवर सहमती दर्शवलीय. शत्रुत्व कमी करणे, चर्चेचा मार्ग मोकळा करणे. पुढील जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी हा युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय.

Bharat Jadhav

  • पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावर्ती संघर्षानंतर ४८ तासांची युद्धबंदी जाहीर करण्यात आली.

  • कंधारमधील हवाई हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

  • दोन्ही देशांनी शांतता चर्चेचा मार्ग मोकळा करण्यासाठी निर्णय घेतला.

पाकिस्तान आणि अफगाणिस्ता दोन्ही देशात तणाव वाढलाय. दोन्ही देशातून मिसाईल आणि सीमेरेषेवर झालेल्या गोळीबारात अनेक सैनिकांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात कंधारमधील १५ जणांचा मृत्यू झालाय. तर मंगळवार रात्रीपासून बुधवारी संध्याकाळपर्यंत झालेल्या हल्ल्यात ५० जणांचा मृत्यू झाला. आता दोन्ही देशांनी ४८ तासांच्या तात्पुरत्या युद्धबंदीवर सहमती दर्शवलीय.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी ६ वाजता (पाकिस्तान वेळेनुसार) ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धबंदी लागू केलीय. दोन्ही शेजारी देशांमधील सीमेवर झालेल्या संघर्षामुळे तणाव वाढल्यानंतर हा युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आलाय. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या युद्धबंदीचा उद्देश हा सीमेवर झालेल्या लढाईनंतर शत्रुत्व कमी करणे आणि संवादाचा मार्ग मोकळा करणे आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही बाजू म्हणजेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे वाद सोडवतील. समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील. अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील कंधार प्रांतात बुधवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने हवाई हल्ले केले. त्यानंतर दोन्ही बाजुकडून जोरदार लढाई सुरू झाली, त्यानंतर युद्धबंदी लागू करण्यात आली.

अफगाण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्पिन बोल्दाक जिल्ह्यातील निवासी भागात झालेल्या हल्ल्यात किमान १५ नागरिक ठार झालेत महिला आणि मुलांसह १०० हून अधिक जण जखमी झालेत. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले, अफगाण सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान या लढाईत अनेक घरे देखील उद्ध्वस्त झाली आहेत. स्थानिक रुग्णालयात ८० हून अधिक महिला आणि मुलांवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT