देश विदेश

Airstrike in Pakistan : पाकिस्तानच्या हवाई दलाचा स्वत:च्याच देशावर बॉम्ब हल्ला, ३० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Pakistan airstrike kills 30 civilians in Khyber Pakhtunkhwa : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तान हवाई दलाने ८ बॉम्ब टाकले. दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये तब्बल ३० नागरिकांचा मृत्यू, महिलां-मुलांचाही बळी. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण.

Namdeo Kumbhar

Pakistan Air Force Airstrike in Khyber Pakhtunkhwa: 30 Killed, Many Injured : पाकिस्तानच्या हवाई दलाने आज खैबर पख्तूनख्वा येथे आठ बॉम्ब टाकले. या हल्ल्यात त्या गावातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह किमान ३० जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पख्तूनख्वा येथील दारा गावात जेएफ-१७ लढाऊ विमानांमधून एलएस-६ बॉम्ब टाकण्यात आले. एकामागून एक आठ बॉम्ब टाकल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गावात जिकडे तिकडे राख झाली आहे.

पाकिस्तानच्या हवाई दलाने आपल्याच देशात एअर स्ट्राईक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात पाकिस्तानने एअर स्ट्राईक केला, पण यामध्ये निष्पाप ३० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये घरांचे तर मोठे नुकसान झाले आहेच. हवाई हल्ल्यामध्ये निष्पाप महिला अन् मुलांचा मृत्यू झाला आहे.

खैबर पख्तूनख्वामधील घाटी भागातील मत्रे दारा गावामध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाने रात्री दोन वाजता JF-17 विमानाने ८ बॉम्ब टाकले. रिपोर्ट्सनुसार, LS-6 गायडेड बॉम्ब फेकल्यामुळे क्षणात दारा गावात होत्याचे नव्हते झाले. जिकडे तिकडे हाहाकार माजला आहे. आतपर्यत मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहे. नागरिक झोपेत असताना पाकिस्तान हवाई दलाने ८ बॉब्म फेकले. त्यामुळे नागरिकांचा झोपेतच मृत्यू झाला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्खं गाव झोपेत होतं, त्यावेळी पहाटे दोन वाजता अचानक आकाशातून हवाई दलाने एका पाठोपाठ एक ८ LS-6 गायडेड बॉम्ब फेकले. या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. गावात जिकडे तिकडे हाहाकार माजला होता. प्रत्येकजण सैरावैर धावत जीव वाचवत होता. या हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मारण्यासाठी खास ऑपरेशन सुरू कऱण्यात आले होते. या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती हवाई दलाला मिळाली होती. त्यामुळे रात्री बॉम्ब हल्ला करण्यात आला. पण यामध्ये ३० गावकऱ्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर परिषदेच्या निवडणूकांची तारीख जाहीर; २ डिसेंबरला होणार मतदान

Pune Crime: पुणे हादरले! दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Winter Beauty Hacks: फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठीही उपयुक्त आहे Vaseline

माजी नगरसेवकाकडून तरूणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, ९ वर्षांपर्यंत छळलं; नेमकं प्रकरण काय?

Election Commission PC Live : आयोगाची पत्रकार परिषद, आयुक्त दिनेश वाघमारेंकडून निवडणुकीची घोषणा

SCROLL FOR NEXT