Pune retired banker duped in fake RAW mission scam : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थेट केंद्रीय गृहमंत्र्यासमवेत ‘कॉन्फरन्स कॉल’ केल्याचा देखावा करून कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. गोपनीय मिशनच्या बदल्यात ३८ कोटींचे बक्षीस अन् गृहमंत्र्यांशी संपर्क असे सांगत पुण्यात निवृत्त बँक अधिकाऱ्याला चार कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
‘रॉ’च्या मिशनचे आमिष दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल चार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येताच पुण्यात एकच खळबळ उडाली. फसवणुकीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे काही नातेवाईक सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून पर्वती पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुभम सनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. फिर्यादी यांच्या मेहुण्याने शुभम गुप्तचर खात्यात कार्यरत आहे, त्याने एक मिशन पूर्ण केले असून, त्याला ३८ कोटींचे बक्षीस मिळणार आहे अशी बतावणी केली. मात्र हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी, वकिलांची फी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू देणे गरजेचे असल्याचं सांगितलं.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी केंद्रीय गृहमंत्र्यासमवेत ‘कॉन्फरन्स कॉल’ केल्याचा देखावा केला. या सर्व बनावट संवादांवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी गेल्या चार वर्षांत सतत रक्कम भरली. गेल्या चार वर्षांपासून फिर्यादी यांनी आरोपींच्या विविध खात्यांवर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सगळा प्रकार बनाव असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी आता पोलिसांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला असून पुढील तपास सुरू आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.