जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. या भयानक कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल. त्यांना सोडले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिलीय. पंतप्रधान मोदींनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय.
'पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो.' ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जातेय, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करताना दिलीय. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल, त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही.
दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार अटळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल, असंही पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. दक्षिण काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात २७ जणांचा मृत्यू झाला यात महराष्ट्रातील २ जणांचा समावेश आहे. तर १२ जण जखमी झालेत. हल्ल्याच्या ठिकाणाचा एक कथित व्हिडिओ समोर आलाय. यात भयानक स्थिती पाहायला मिळत आहे.
अनेकजण रक्ताने माखलेले आणि जमिनीवर बेशुद्ध पडलेले दिसताहेत. एक महिला पर्यटक रडताना आणि त्यांच्या प्रियजनांना शोधताना दिसतेय. अद्याप या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कश्मीरमधील दहशतवादी घटना कमी झाल्या होत्या. तेथील पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. त्याच दरम्यान हा दहशतवादी हल्ला झाला. दरम्यान ३८ दिवसांची अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला. दहशतवादी डोंगरावरून बैसरन खोऱ्यात आले आणि तेथील पर्यटकांवर गोळीबार केला. बैसरन हे पहलगाममधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, ते ताबडतोब श्रीनगरला रवाना झालेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अमित शहा म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना या घटनेची माहिती दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.