DR. MC Dawar Death Saam tv
देश विदेश

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

DR. MC Dawar Death News : गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर यांचं निधन झालं. डावर यांच्या निधनाने लोकांध्ये शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

जबलपूर : डॉक्टरांना पृथ्वीवर देवाचं रुप मानलं जातं. याच डॉक्टरांच्या पेशातून लोकसेवा करणारे पद्मश्री डॉ. एमसी डावर यांच शुक्रवारी सकाळी निधन झालं. एमसी डावर यांनी ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एमसी डावर यांच्या निधनाने लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. एमसी डावर यांच्यावर गुप्तेश्वर मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पाकिस्तानात झाला होता जन्म

जबलपूर जिल्ह्यातील डॉ. एमसी डावर यांचा जन्म १६ जानेवारी १९४६ रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला. फाळणीनंतर डॉ. एसी भारतात आले. त्यांनी जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये १९६७ साली एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी १९७१ साली भारत-पाक युद्धादरम्यान एक वर्षीय भारतीय सैन्याची सेवा केली. १९७२ सालानंतर जबलपूरच्या लोकांची अत्यंत कमी दरात रुग्णांची सेवा केली.

डॉ. एमसी डावर यांनी सुरुवातीला २ रुपयांमध्ये रुग्णांचे उपचार करत होते. आता ते २० रुपये घेत होते. डॉ. एमसी डावर यांना भारत सरकारने ७४ व्या स्वातंत्र्य दिनी पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला.

नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नवनीत सक्सेना यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. डॉ. एमसी डावर सर्वांसाठी आदर्श होते. भारतातील डॉक्टरांनी त्यांच्या लोकसेवा करण्याच्या स्वभावातून आदर्श घेतला पाहिजे. त्यांनी डॉक्टरी पेशाचं व्यवसाय केला नाही. त्यांनी डॉक्टर म्हणून नेहमी लोकांची सेवा केली. ते लोकांकडून उपचाराची फी म्हणून २० रुपये घ्यायचे. डॉक्टर एमसी डावर यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी असायची.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, 'पद्मश्री डॉ. एमसी डावर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दु:खद आहे. डावर यांचं जाण्याने फक्त जबलपूरसाठी नव्हे,तर संपूर्ण देशाची हानी झाली आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांची भेट झाली, त्यावेळी त्यांच्याकडून लोकसेवेची प्रेरणा मिळाली होती. त्यांच्या जाण्याने लोकसेवा आणि लोक कल्याण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT