Ritesh Agarwal  SAAM TV
देश विदेश

OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून मृत्यू

OYO Founder Ritesh Agarwal Father Dies : ओयो (OYO) चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी निधन झाले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

OYO Founder Ritesh Agarwal Father Dies : ओयो (OYO) चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी निधन झाले. रिपोर्टनुसार, गुरुग्राममध्ये एका टोलेजंग इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ओयोच्या प्रवक्त्यानं रितेश अग्रवाल यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Latest Marathi News)

गुरुग्राम पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, या घटनेची माहिती जवळपास १ वाजता मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. रमेश अग्रवाल यांचा मृत्यू २० व्या मजल्यावरून पडून झाल्याचे समोर आले. ते डीएलएफ क्रिस्टा सोसायटीत राहत होते. ते आपल्या घराच्या बाल्कनीतून पडले. त्यात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी घरात इतरही मंडळी होती. तीन दिवसांपूर्वीच रितेश अग्रवाल यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या तीन दिवसांनंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे.

रितेश अग्रवाल म्हणाले की, आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणा असलेले आमचे वडील रमेश अग्रवाल यांचे १० मार्च रोजी निधन झाले. त्यांचे निधन ही आमच्या कुटुंबीयांसाठी मोठी हानी आहे. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द आमच्या हृदयात राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT