narendra modi saam tv
देश विदेश

अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्याने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, कोणी वाचवला जीव? धक्कादायक अहवाल समोर

PM Narendra Modi Plot : अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला होता, असा दावा ऑर्गनायजरच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. या अहवालानंतर एकच खळबळ उडाली आहे

Vishal Gangurde

बांगलादेशच्या सेंट मार्टिन द्वीपवर अमेरिकी अधिकारी जॅक्शनचा रहस्यमय मृत्यू

अमेरिकेतील हा सैन्य अधिकारी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधातील कथित हत्येच्या कटाशी संबंधित होता.

भारत आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त कारवाईने हा कट उधळला

संमेलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची गुप्त चर्चा झाली

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये अमेरिकीचे सैन्य अधिकारी टेरेन्स अर्वेल जॅक्शन यांच्या रहस्यमय मृत्यूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ऑर्गनायजरच्या एका रिपोर्टमध्ये जॅक्सनला पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, भारत आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त कारवाईने कथित हत्येच्या कटाचा पर्दाफाश करून उधळून लावला.

रिपोर्टनुसार, जॅक्सनला बांगलादेशच्या सेंट मार्टिन द्विपवर सैन्याच्या प्रशिक्षणासाठी तैनात करण्यात आलं होतं. त्याला मोदींच्या विरुद्ध गुप्त कारवाई करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय सहयोग संघटनेच्या शिखर संमेलनासाठी चीनच्या तियानजिनमध्ये होते. त्यावेळी जॅक्सनचा मृत्यू झाला.

या संमेलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्लादिमीर पुतीन यांची कारमध्ये ४५ मिनिटे गुप्त चर्चा झाली. यावेळी हायप्रोफाइल अंजेडा आणि दक्षिण आशियामध्ये सुरू असलेल्या गुप्तचर हालचालींवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

ऑर्गनायजरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा संदर्भ देत म्हटलं की, 'त्यांनी २ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सेमीकॉन शिखर संमेलनात म्हटलं होतं की, 'तुम्ही का टाळ्या वाजवत आहात? मी चीनमध्ये गेलो होतो म्हणून की मी पुन्हा भारतात परतलो आहे? यामुळे टाळ्या वाजवत आहात.

विश्वलेषकांच्या माहितीनुसार, त्यांनी या भाषणातून पंतप्रधानांनी त्यांच्या विरोधातील कटाच्या धोक्याविषयी संकेत दिले. रिपोर्टनुसार,सीआयएच्या सक्रियतेबाबत आणि भारतविरोधी संभाव्य प्रयत्नांबाबतही शंका व्यक्त करण्यात आलीये. गेल्या काही वर्षांत पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये अमेरिकन गुप्तचर हालचालींबाबत चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांचं निधन

Technology News: मानवी मन वाचता येणार; मेंदू कॉम्प्युटरशी कनेक्ट होणार

Amazon Layoff : कामावर येऊ नका, सकाळी ई-मेल धडकला; अ‍ॅमेझॉनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात

Janjira Fort : जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद, प्रशासनाने का घेतला निर्णय?

Zodiac Signs Tuesday: मंगळवारच्या कार्तिक सप्तमीला चार राशींसाठी शुभ संकेत; नवी सुरुवात होणार यशस्वी

SCROLL FOR NEXT