Jammu Kashmir Blackout  Saam Tv News
देश विदेश

Big Breaking : पाकिस्ताकडून भारतावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न; जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट, भारताने पाकड्यांचे ८ मिसाईल पाडले

Jammu Kashmir Blackout : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. एअरपोर्टवर हल्ल्याचा आवाज आल्याने सगळीकडे ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. हवाई हद्दीत ड्रोन दिसल्याने लष्कर अलर्ट मोडवर आलं आहे.

Prashant Patil

जम्मू-काश्मीर : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणाव वाढलाय. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार हल्ले करण्यात येत आहेत. भारताकडूनही पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलं जात आहे. भारतासोबत तणाव अधिक तीव्र झाला असतानाच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. भारताने थेट पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला केलाय. रावळपिंडी क्रिकेट ग्राऊंडपासून १०० मीटर असलेल्या ठिकाणी हा ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे रावळपिंडीचं मैदान उद्ध्वस्त झालंय.

त्याचदरम्यान, आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. एअरपोर्टवर हल्ल्याचा आवाज आल्याने सगळीकडे ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. हवाई हद्दीत ड्रोन दिसल्याने लष्कर अलर्ट मोडवर आलं आहे. सतवारी कॅम्पसमध्ये हा हल्ल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पठाणकोट आणि पुंछमध्ये सायरनचा आवाज देण्यात आला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर आणि राजस्थानच्या सीमेलगतच्या भागावर ब्लॅकआऊट करण्यात आलेला आहे. भारताच्या S-400 ने पाकिस्तानचे ८ मिसाईल पाडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT