projectile-like object found in Rajasthan Saam Tv
देश विदेश

India Vs Pakistan: जैसलमेरमध्ये जिवंत बॉम्ब, पंजाबमध्ये शेतात पडलं पाकिस्तानचं मिसाईल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

Operation Sindoor: पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोल आणि मिसाईल हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानने टाकलेले मिसाईल पंजाबमध्ये आढळले तर राजस्थानमध्ये जिवंत बॉम्ब आढळला आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Priya More

भारत पाकिस्तानातील तणाव आणखी वाढत चालला आहे. पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबार, ड्रोन हल्ला आणि बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. मध्यरात्री पाकिस्ताने जैसलमरे, बिकानेर आणि श्रीगंगानगरसह सीमेलगत असलेल्या अनेक ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. भारतीय लष्कराने देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. पाकिस्ताने ५० पेक्षा अधिक ड्रोन भारताने पाडले. अशातच आता राजस्थानच्या राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जिवंत बॉम्ब आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेरमधील किशनघाट परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आळा आहे. हा बॉम्ब जमिनीत अर्धा गाडला गेला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिस आणि प्रशासनाला माहिती दिली आहे. याची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसर सील केला आहे. घटनास्थळी १०० मीटरच्या परिघात कोणालाही येण्या-जाण्याची परवानगी नाही.

लष्कराची क्यूआरटी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या बॉम्बची तपासणी करण्यासाठी लष्कराची क्यूआरटी टीम जैसलमेरला पोहोचली आहे. तो बॉम्ब सक्रिय आहे की निष्क्रिय आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. बॉम्ब आढळल्यामुळे किसनघाटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तर दुसरीकडे पंजाबच्या होशियारपूरमध्ये पाकिस्तानचे मिसाईल आढळू आले आहे. हे मिसाईल शेतामध्ये पडले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तपास सुरू केला आहे. याठिकाणी नागिरकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचे व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

SCROLL FOR NEXT