Maxico Firing Saam TV
देश विदेश

Maxico Firing: मॅक्सिको शहर हादरलं; अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू, महापौरांचाही समावेश

गोळीबाराची घटना घडली त्यावेळी सिटी हॉलमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मेक्सिकोमध्ये (Maxico) झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मेक्सिकोतील सॅन मेगुल टोटोलेपन येथे असलेल्या सिटी हॉलमध्ये हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. मृतांमध्ये महापौरांचाही (Maxico Mayor) समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

गोळीबाराची घटना घडली त्यावेळी सिटी हॉलमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. गोळीबाराच्या घटनेत हल्लेखोरांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमधील दृष्य विचलित करणारं आहे. सर्वत्र रक्ताने माखलेले मृतदेह, जखमी व्यक्ती दिसत आहेत. इमारतीवर देखील गोळीबाराच्या खुणा दिसत आहेत. (International News)

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि फोटोंमध्ये सभागृहाबाहेर केवळ 18 मृतदेह दिसत आहेत. या आधारे आतापर्यंत 18 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

मृतांमध्ये शहराचे महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील, माजी महापौर जुआन मेंडोझा आणि सात महापालिका पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सिटी हॉलवर गोळीबार करण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरात बस आणि इतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली.

लॉस टेकलेरोस या गुन्हेगारी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महापौर कोनराडो मेंडोझा हे मेक्सिकोच्या पीआरडी पक्षाशी संबंधित होते. या पक्षानेही महापौरांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पक्षाने या घटनेचा निषेध केला असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT