अमर घटारे, अमरावती
अमरावती: काल, ५ ऑक्टोबरला शिवसेनेच्या (Shivsena) राजकीय इतिहासात पहिल्यांदात दोन दसरा मेळावे झाले. एक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. मुंबईत झालेल्या या दोन्ही मेळाव्यांमधून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर आणि भाजपवर सडकून टीका केली होती. याबाबत आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. (Shivsena Dasara Melava News)
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. रवी राणा म्हणाले की, उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फुसके बार होती. हिंदुत्ववाचं नाव घेऊन हिंदू विचारांची दिशाभूल करुन त्यांनी सभा घेतली. हिंदुत्ववाचा देखावा करण्याची त्यांना आता गरज पडली आहे, तर बाळासाहेबांची विचारधारा त्यांनी सोडल्याने त्यांना झटका बसला व 40 आमदार पळाले. त्यामुळे आता त्यांना हिंदुत्व आठवत आहे की हिंदुत्व काय असते. तर महाराष्ट्र अडीच वर्षे वाऱ्यावर सोडून आता त्यांना राज्याची चिंता दिसत आहे. सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदेंसोबत आहे, तर केवळ उद्धव ठाकरेंकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे लोक सोबत आहे म्हणून त्यांची ही परिस्थिती झाली आहे अशी खोचक टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. (Maharashtra News)
दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले ते ऐकण्यासाठी लोकं त्यांच्या सभेत आले होते. एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं नेऊ शकतात. तर उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडलं आहे. कारण सभेत उद्धव ठाकरे फक्त फिल्मचे डॉयलॉग सांगत होते अशी खिल्ली नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंची उडवली. अडीच वर्ष उद्धव ठाकरे घरात बसले होते त्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं अशी टीकाही त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.