Mukesh Ambani
Mukesh AmbaniSaam Tv

Mukesh Ambani : रिलायन्स हॉस्पिटल उडवून देणार; मुकेश अंबानी कुटुंबीयांना संपवण्याची धमकी

अंबानी परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ५ ऑक्टोबरला डीबी मार्ग पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयाच्या फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला होता. (Mukesh Ambani Latest News)

इतकेच नाही तर या अज्ञात व्यक्तीने अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

Mukesh Ambani
माझ्या जागी दुसरा कुणी असता तर हर्ट अटॅक नक्कीच आला असता; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. (Tajya News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी १ वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लॅंडलाईन नंबरवर कॉल आला होता. रुग्णालयाला बॉंबने उडवून देण्याची तसेच मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. या प्रकरणाची दखल डीबी मार्ग पोलिसांनी घेतली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

या आधीही जीवे मारण्याची धमकी

या आधी १५ ऑगस्टलाही रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये असाच फोन आला होता. त्या व्यक्तीने रूगनलायच्या डिस्प्ले नंबरवर आठ धमकीचे कॉल केले होते. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये पोलिसांनी धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली होती.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com