Amit Shah SaamTV
देश विदेश

देशात पहिल्यांदाच होणार ऑनलाईन जनगणना, अमित शहांची मोठी घोषणा

देशात पुढील जनगणना ई- जनगणना होणार

साम टीव्ही ब्युरो

मुंबई: देशात पुढील जनगणना ई- जनगणना होणार आहे. कोरोनाची (Corona) लाट कमी होत असतानाच देशात ई- जनगणना सुरू होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली आहे. ई- जनगणनेचे काम २०२४ पूर्वी पूर्ण केले जाणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

हे देखील पाहा-

गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटी येथे देशात प्रथम होणाऱ्या ई-जनगणनेच्या पहिल्या इमारतीचे उद्घाटन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीत (Delhi) राष्ट्रीय लोकसंख्या इमारतीचे बांधकाम यावर्षी ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. हाय-टेक, त्रुटी-मुक्त, बहुउद्देशीय जनगणना अॅप जन्म, मृत्यू, कौटुंबिक आर्थिक स्थिती इत्यादी सर्व वैयक्तिक माहिती अपडेट करण्यास सक्षम राहणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यातून मिळालेल्या अनेक प्रकारच्या माहितीचा फायदा भावी सरकारांना मिळणार आहे, जेणेकरून ते आपली धोरणे आणि अनेक लोकांसाठी काम करू शकणार आहे.

आपण आतापर्यंत जनगणना अतिशय हलक्यात घेतली आहे. पुढील काळात जी काही जनगणना होणार आहे. ती ई-जनगणना असणार आहे. पुढील २५ वर्षांसाठी ही जनगणना असणार आहे. सर्वप्रथम मी स्वत: याची सुरुवात करणार आहे. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकणार आहे. यामध्ये जन्म- मृत्यू नोंदणीची देखील व्यवस्था केली आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले आहे. ही जनगणना संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, आसामसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. काय नियोजन करावे लागणार हे जनगणनाच सांगू शकते. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनाच्या आधारावर तयार केल्या जात आहेत. अचूक जनगणनेच्या आधारे २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार तेव्हा देश प्रत्येक क्षेत्रात पुढे राहणार आहे. देशात अनेक त्रुटींची चर्चा केली जाते. पाणी नाही, रस्ता नाही. प्रत्येकजण उणिवांवर चर्चा करत आहे. परंतु, ते कसे दूर करावे हे कोणीही सांगत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. यावरून कुठे विकासाची गरज आहे हे कळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT