One Nation, One Election Saam tv
देश विदेश

One Nation One Election News : देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' लागू होणार? कोविंद समितीने सूचनांची आकडेवारी केली जारी

One Nation One Election News : ४६ राजकीय पक्षांकडूनही सूचना मागवण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत १७ राजकीय पक्षांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

प्रविण वाकचौरे

One Nation One Election :

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 'वन नेशन-वन इलेक्शन' संदर्भात जनतेकडून २१,००० सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ८१ टक्के लोकांनी देशातील लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी मतदान केले आहे.

४६ राजकीय पक्षांकडूनही सूचना मागवण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत १७ राजकीय पक्षांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.  कॉंग्रेस आणि टीएमसीसह विविध विरोधी पक्षांनी एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला विरोध केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीची रविवारी तिसरी बैठक झाली. एकूण २०,९७२ अर्ज समितीकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८१ टक्के लोकांनी एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेशी सहमती दर्शवली आहे. समितीची पुढील बैठक आता २७ जानेवारीला होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (Latest Marathi News)

समितीच्या रविवारच्या बैठकीला राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, 15 व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एनके सिंह, माजी लोकसभेचे सरचिटणीस सुभाष सी कश्यप आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी उपस्थित होते. यामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनांचीही समितीने नोंद घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

SCROLL FOR NEXT