दिल्लीतही ओमिक्रॉनची एंट्री? LNJP रुग्णालयामध्ये परदेशातून आलेले 12 जण पॉझिटिव्ह Saam TV
देश विदेश

दिल्लीतही ओमिक्रॉनची एंट्री? LNJP रुग्णालयामध्ये परदेशातून आलेले 12 जण पॉझिटिव्ह

दिल्लीतील (Delhi) लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात कोविड-19 'ओमिक्रॉन' प्रकाराची (Omicron Variant) लागण झाल्याचा संशय असलेल्या 12 रुग्णांना आतापर्यंत दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष शाळीग्राम

दिल्ली: दिल्लीतील (Delhi) लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात कोविड-19 'ओमिक्रॉन' प्रकाराची (Omicron Variant) लागण झाल्याचा संशय असलेल्या 12 रुग्णांना आतापर्यंत दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

दिल्लीत काल रात्री आठ ओमिक्रॉन संशयित रुग्णांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज चार संशयितांना दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी दोघांची चाचणी COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे, तर इतर दोघांच्या चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. या चार संशयितांपैकी दोन ब्रिटनमधून, एक फ्रान्समधून आणि एक नेदरलँडमधून आल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच त्यांनी आज चारही रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

याआधी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये (Karnataka) नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये 66 आणि 46 वर्षीय पुरुष आहेत. म्हणजेच कर्नाटकात संभाव्यत: धोकादायक कोरोना विषाणूची दोन प्रकरणे आढळून आली आहेत.

परदेशातून मुंबईत आलेले 9 प्रवासी कोरोना बाधित !
आत्तापर्यंत ओमिक्रॉन संक्रमित दक्षिण आफ्रिकेसह 40 देशांमधून आतापर्यंत 2868 प्रवासी मुंबईत (Mumbai) आले आहेत. यापैकी 485 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये आठ प्रवासी कोरोना बाधित आढळून आले होते तर एकजण संपर्कात आल्याने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. परदेशातून आलेले बहुतेक प्रवासी मुंबई विमातळावर उतरतात त्यामुळे आता आता मुंबई महापालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीला सुरुवात

बदल्याची आग! जामिनावर बाहेर आला अन् अडकला ट्रॅपमध्ये, शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा रक्तरंजित थरार

Refrigerator placement: फ्रिज खिडकीजवळ ठेवावा की भिंतीजवळ? तुमच्या घरी कुठे आहे, वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा

Pune Crime: पुणे हादरले! तरुणावर प्राणघातक हल्ला, कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; १० हजारांचे तिकीट काढून घुसले अन् ४.३ लाखांची केली चोरी

SCROLL FOR NEXT