ओमिक्रॉनचा पहिल्या पेशंटने दुबईला काढला पळ ! नेमकं काय झालं ? Saam Tv
देश विदेश

ओमिक्रॉनचा पहिल्या रुग्णाने दुबईला काढला पळ ! नेमकं काय झालं ?

दोन रुग्णांपैकी एक रुग्ण पाच दिवसांपूर्वीच दुबईला (Dubai) पळून गेला आहे आहे अशी माहिती समोर आली आहे. हा रुग्ण दक्षिण आर्फिकेतून दुबईमार्गे २० नोव्हेंबर रोजी कर्नाटकात आला होता. त्याने लशीचे दोन्ही डोस घेतले होते.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना (Corona) विषाणूने थैमान घातले. त्यानंतर आता ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) या नवा प्रकार आढळून आल्याने २९ देशात हा पसरला आहे. कालच (ता. २) कर्नाटकात (Karnataka) आरोग्य मंत्रालयाने माहिती (Ministry Of Health) दिली की, या विषाणुची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. पण त्या रुग्णांपैकी एक रुग्ण पाच दिवसांपूर्वीच दुबईला (Dubai) पळून गेला आहे आहे अशी माहिती समोर आली आहे. हा रुग्ण दक्षिण आर्फिकेतून दुबईमार्गे २० नोव्हेंबर रोजी कर्नाटकात आला होता. त्याने लशीचे दोन्ही डोस घेतले होते.

आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्याची माहिती गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. तर. जगभरात आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे आणि यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. जगात या विषाणुचे आतापर्यंत ३७३ रुग्ण आढळून आले आहेत.

हे देखील पहा-

नेमकं काय झालं ?

ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा बंगळूरमधील एक डॉक्टर आहे. त्यांना २१ नोव्हेंबरला ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. नंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तीन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. नंतर त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे चाचणी अहवालातून समोर आले होते. त्यांच्या थेट संपर्कात १३ जण तर अप्रत्यक्ष संपर्कात २५० जण आले होते. कर्नाटक सरकारने (Karnataka Government) त्यांना शोधून त्यांच्या चाचण्या घेण्यास सुरवात केली आहे अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.

तर, २० तारखेला दक्षिण आर्फिकेतून दुबईमार्गे दुसरा रुग्ण कर्नाटकात आला होता. त्याचे नमुने त्याचदिवळी विमानतळावर घेण्यात आले होते, भारतात चाचणी केली त्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला. मात्र त्याला कोणतीही लक्षणे नव्हती म्हणून, तो एका हॉटेलमध्ये थांबला होता होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि २२ तारखेला त्याचे नमुने जनुकीय तपासणीसाठी (genetic testing) प्रयोगशाळेत पाठवले. आणि त्याला हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला देण्यात आला.

त्या रुग्णाने २३ तारखेला खासगी लॅबमध्ये (Private Pathology Lab) पुन्हा चाचणी केली. तेव्हा त्याचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर २७ तारखेला मध्यरात्री तो कॅबने विमानतळावर गेला. आणि तिथून तो विमानाने दुबईला गेला अशी माहिती बेंगलुरूच्या महापालिकेकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

SCROLL FOR NEXT