Odisha Train Accident Saam Tv
देश विदेश

Odisha Train Accident: ओडिशात भीषण रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक, 132 जखमी

ओडिशात भीषण रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक, 132 जखमी

Satish Kengar

Odisha Train Accident: ओडिशात मोठा रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील हावडा स्थानकावरून तामिळनाडूतील चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशातील बालासोर जिल्ह्यात मालगाडीला धडकली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीला धडक दिल्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे १८ डब्बे रुळावरुन घसरले आहेत. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात १३२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी आडकल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. (Latest Marathi News)

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना स्थानिक वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने सांगितलं की, आम्ही घटनास्थळी १५ रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. जखमींना सोरो सीएचसीमध्ये हलविण्याचे काम सुरू झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT