Senior BJD leader and Rajya Sabha MP Debashish Samantaray has resigned from the party and Parliament membership saam tv
देश विदेश

Politics: माजी मुख्यमंत्र्यांना मोठा राजकीय धक्का; नीकटवर्तीय निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Biju Janata Dal MP Resignation : ओडिशामध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नवीन पटनायक यांचे निकटचे सहकारी असलेले राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय यांनी राजीनामा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • बीजेडीचे वरिष्ठ नेते देबाशीष सामंतराय यांचा राजीनामा.

  • पक्षातील दुर्लक्षामुळे निर्णय घेतल्याचा दावा.

  • राज्यसभा सदस्यत्वाचाही दिला राजीनामा.

बिजू जनता दलचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते नवीन पटनायक यांचे नीकटवर्तीय मानले जात होते. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पक्षांतर्गत आपल्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आपण राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी दिले.

बिजू जनता दल पक्षातून राजीनामा देण्यासोबतच त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या राजीनाम्यावर आणि देबाशीष सामंतराय यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते रवींद्र नारायण बेहरा म्हणाले की, ओडिशामधील राजकीय वातावरण बदलू लागले आहे. सध्या बीजेडीच्या विकेट्स एक-एक करून पडत आहेत. बीजेडी सरकार दादागिरी आणि गुंडगिरीसाठी ओळखले जात होती. या वक्तव्यानंतर ते भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

देबाशीष सामंतराय यांनी राजीनाम्याची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, "बिजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना माझा राजीनामा देतोय. पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत मी सेवा, संघटन आणि समर्पण या माझ्या तत्त्वांचे पालन केले आहे. भविष्यातही मी ओडिशाच्या लोकांसाठी माझा संघर्ष सुरू ठेवीन. जय जगन्नाथ."

"मी नेहमीच स्वतःला पक्षाच्या हितासाठी पूर्णपणे समर्पित केलं. आणि अनेक वर्षे पूर्ण निष्ठेने सेवा केली. तरीही अलीकडे पक्षातच पद्धतशीरपणे माझी प्रतिमा मलिन केली जातेयं. पक्षाला आता माझ्या सेवेची गरज नाही. त्यामुळे, जनहितार्थ मी हा कठीण निर्णय घेतला आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारा, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सामंतराय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "आज, २५ मे रोजी, मी बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मला राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन. अविभाजित कटक जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्याची आणि ओडिशाचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी या निमित्ताने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, असं म्हणत यांनी नवीन पटनायक यांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेहरा फुगलेला दिसतोय? चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो कराच

आळंदीत सेवेकऱ्याची कारस्थाने उघड? खात्यात १० लाखांची उलाढाल, मंदिर प्रशासनात खळबळ

Gokul Milk News : बिगुल वाजलं! कोल्हापुरात 'गोकुळ'मध्ये धुरळा; निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

Wheat chapati: 15 दिवस गव्हाची चपाती खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतात?

Post Office : मालामाल करणारी पोस्ट ऑफिसची योजना! गुंतवणूकीवर हमखास मिळेल ₹90000 रुपयांचं व्याज

SCROLL FOR NEXT