Odisha Latest News Saamtv
देश विदेश

Odisha News: क्लास बंक केल्याने सरांनी दिली शिक्षा... चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; शाळेत काय घडलं?

Odisha Latest News: विद्यार्थी क्लास सुरू असताना इतर मुलांसोबत बाहेर खेळत होता. त्यामुळे शिक्षकांनी त्याला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली

Gangappa Pujari

Odisha News:

शाळेत उठाबशा काढताना इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ओडीसामधून समोर आली आहे. हा विद्यार्थी क्लास सुरू असताना इतर मुलांसोबत बाहेर खेळत होता. त्यामुळे शिक्षकांनी त्याला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. मात्र उठाबशा काढताना मुलगा बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षकांनी दिलेली उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ओडीसामधून समोर आली आहे. ओडीसाच्या ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील हे प्रकरण असून रुद्र नारायण सेठी असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रुद्र नारायण सेठी हा ओरली येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होता. मंगळवारी हा विद्यार्थी शाळेच्या उद्यानात इतर विद्यार्थ्यांसोबत खेळत होता. मुलांचा आवाज ऐकून तेथून जाणाऱ्या एका शिक्षकाने विद्यार्थ्याला खेळण्याची शिक्षा म्हणून उठाबशा करण्यास सांगितले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उठाबशा काढता काढता मुलाची प्रकृती बिघडल्याने तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. शाळेतील शिक्षकांनी त्याला तात्काळ जवळच्या कम्यनिटी सेंटरमध्ये उपचारासाठी हलवले. तिथून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचे शिक्षणाधिकारी निलांबर मिश्रा यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणी कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT