asha worker matilda kullu
asha worker matilda kullu 
देश विदेश

फोर्ब्स सन्मानित आशा सेविका Matilda Kullu ने वाचविले शेकडाे जीव

साम न्यूज नेटवर्क

ओडिशा : आशा सेविका माटिल्डा कुल्लू (matilda kullu) यांचा Forbes India W-Power 2021 यामध्ये बँकर अरुंधती भट्टाचार्य, अभिनेत्री रसिका दुग्गल यांसारख्या २१ महिलांच्या यादीत समावेश झाला आहे.

ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील माटिल्डा यांनी गावात आरोग्य विषय चळवळ उत्तमरित्या राबवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे येथील ग्रामस्थ विशेषत: रुग्ण आजही काळ्या जादूच्या विळख्यात सापडले असते. परंतु १५ वर्षापासून अथक परिश्रम घेतलेल्या माटिल्डा यांच्यामुळे आता ते रुग्णालयाचे वाट धरु लागले आहेत.

खरंतर माझ्यासाठी हे काम खूप अवघड हाेते असं माटिल्डाने स्पष्ट केले. सुंदरगड जिल्ह्यातील बारागाव तहसीलमधील गर्गडबहाल गावात माझी १५ वर्षांपूर्वी आशा सेविका म्हणून नियुक्त झाली. ज्यावेळी येथील ग्रामस्थ आजारी पडत असतं. त्यावेळी ते जादुटाेणा करणा-या व्यक्ती अथवा काळी जादू करणा-या व्यक्तीकडे उपचारासाठी घेऊन जायचे. तेव्हा त्यांना मी रुगणालयात जाण्याचा सल्ला देत असे. रुग्णालयाचे महत्वाचे सांगायचे परंतु सर्वजण माझी चेष्टा करायचे. त्यातच मला काम करताना जातीवादाचा फटका बसला. परंतु मी माझी जिद्द साेडली नाही.

ओडिशातील ४७ हजार आशा कर्मचार्‍यांपैकी माटिल्डा ही एक. ती नेहमी दैनंदिन कामात व्यस्त असते. घरोघरी जाऊन नवजात बालकांचे तसेच किशोरवयीन मुलींचे लसीकरण झाले की नाही ते पहाणे, बाळाच्या जन्मपूर्वी आईची तपासणी, प्रसूती नंतरची तपासणी, बाळंतपणाची तयारी, स्तनपान आणि पूरक आहार आणि पुनरुत्पादक मुलूख संक्रमण (reproductive tract infection) आणि लैंगिक संक्रमित संसर्गासह (sexually transmitted infection) सामान्य संक्रमण प्रतिबंध (prevention of common infections) यावर महिलांचे समुपदेशन करण्याचे कार्य माटिल्डा करीत असते.

पहाटे पाच वाजल्यापासून कार्यरत राहणारी माटिल्डा म्हणते काेविड १९ ची साथ देशात आल्यानंतर रात्रीचा दिवस कधी झाला आणि दिवसाची रात्र कधी हेच समजत नव्हते. इतर वेळी मी घरातील कामे उरकून आमच्या चार जणांचे दुपारचे जेवण तयार करणे, गुरांना चारा देणे ही कामे करीत हाेते. काेविडे १९ ची साथ आल्यानंतर कामाचा ताण वाढला असे घरोघरी भेटीसाठी सायकलवर जाणारी माटिल्डा तिचे काेविड १९ च्या साथीमधील अनुभव सांगू लागली. गेल्या वर्षी जेव्हा साथीचा रोग सुरू झाला तेव्हा मी दररोज ५० ते ६० घरांत कोविड लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करु लागली.

दररोज घरातून बाहेर पडल्यानंतर कोविड संशयितांचा शोध घेणे. संशयितांच्या कुटुंबांना भेटणे आणि त्याचा अहवाल (माहिती) स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवणे हे काम नित्याचे झाले हाेते. पहिल्या टप्प्यात कोविड रुग्णांची खूप अव्हेलाना झाली. त्यामुळे अनेक नागरिक चाचण्या करण्यासाठी पुढं येत नव्हते. अनेकांना आपल्याला वाळीत टाकले जाईल की काय अशी भीती वाटू लागली. नागरिकांशी गाेड बाेलून त्यांचा आत्मविश्वास वाढवून सुमारे ९६४ जणांना (बहुतांश आदिवासी) तपासणीसाठी तयार करण्याचे काम देखील केल्याचे माटिल्डाने नमूद केले.

खरंतर काेविडच्या पहिल्या लाटेत आम्हांला रुग्ण शाेधण्याची जबाबदारी दिली परंतु नागरिकांच्या घरी जाता, रुग्णांना भेटताना माझ्या सारख्या हजाराे आशांसाठी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काहीच दिले नव्हते. ना पीपीई किट, ना मास्क, ना हातमोजे तसेच सॅनिटायझर्स तर दूरच. असाे. आम्ही काम करीत राहिलाे. पहिली लाट ओसरल्यानंतर आणि लसीकरण सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी कठाेर मेहनत घेतल्याचे माटिल्डा यांनी स्पष्ट केले.

गेली १५ वर्ष मी ग्रामस्थांसमवेत कार्यरत राहिल्याने येथील लाेकांनी माझे ऐकले आणि लसीकरण केले असे सांगताना चार हजार पाचशे रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर काम करणा-या माटिल्डाची छाती अभिमाने फुगली हाेती. काेविड १९ च्या साथीच्या काळात दाेन हजार रुपये मानधन घेत काम करणा-या माझ्या सारख्या असंख्य आशा सेविकांना आत राज्य सरकार ४५०० रुपये देत असल्याचे Forbes India W-Power 2021 यामध्ये समाविष्ट झालेल्या माटिल्डाने नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; भेसळीत ॲसिड अन् लाकडी भुशाचा समावेश

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

SCROLL FOR NEXT