कटक : मिनाती पटनायक Minati Patnaik यांनी कटक शहरातील सुताहाट भागातील त्यांची तीन मजली इमारत, सोन्याचे दागिने आणि अन्य सर्व संपत्ती रिक्षाचालक बुधा समल Budha Samal यांना दान केली आहे. मिनाती यांनी बुधाच्या नावाने त्याबाबत इच्छापत्र लिहिले आहे. गेल्या २५ वर्षांपासून मिनाती यांच्या कुटुंबाची आम्ही सेवा करत आहे. मालमत्तेचे कधीही स्वप्नातही पाहिले नाही असे रिक्षाचालक बुधाने बक्षीसपत्र मालमत्तेचा कागद घेताना नमूद केले. woman donates properties worth about Rs 1 crore to rickshaw puller in odisha cuttack
पत्नी आणि दोन मुलांसह राहत असलेला रिक्षाचालक बुधा हा गेल्या २५ वर्षांपासून मिनाती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सेवा करीत असे. संबलपूरला Sambalpur वास्तव्यास असणा-या मिनाती यांचा कटक शहरातील कृष्ण कुमार पटनायक यांच्याशी विवाह झाला हाेता. त्या पती आणि मुलगी कोमलसोबत सुखाने नांदत हाेत्या. त्यांच्या पतीचे वर्षभरापुर्वी तसेच मुलीचे काही दिवसांपुर्वी निधन झाले. पती आणि मुलीच्या निधनानंतर त्यांना काेणीच सांभाळले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांचा साभांळ रिक्षाचालक आणि त्याचे कुटुंबीयाने कोणतीही अपेक्षा न ठेवता केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या तब्येतीची काळजी बुधाचे कुटुंब घेत असे.
रिक्षाचालक बुधा आणि त्याच्या कुटंबियाचे समर्पण, निःस्वार्थ सेवा आणि बांधिलकी पाहून मी आमची सर्व संपत्ती बुधाच्या कुटुंबियास देण्याचा निर्णय घेतल्याचे मिनाती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या मी इच्छापत्र केले आहे. त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर बुधा आणि त्यांच्या कुटुंबाला कोणीही त्रास देणार नाही.
गेल्या २५ वर्षांपासून या कुटुंबाची आम्ही सेवा करत आहे. मालमत्तेचे कधीही स्वप्नातही पाहिले नाही असे रिक्षाचालक बुधाने नमूद केले. माझ्या कुटुंबाने मिनाती यांची त्यांच्या पतीच्या निधनानंतर नेहमी काळजी घेतली आहे. यापुढे देखील आम्ही त्यांची काळजी घेत राहूअसे बुधाने नमूद केले.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.