Ocean water turning acidic could make your favorite fish and seafood disappear. Saam Tv
देश विदेश

तुमच्या ताटातील मासे गायब होणार? समुद्राचं पाणी होतंय विषारी

Impact Of Ocean Acidification On Seafood: तुम्ही जर मासेप्रेमी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे..येत्या काळात तुमच्या ताटातून आवडीचे मासे गायब होऊ शकतात. कारण संशोधकांनी समुद्राबाबत एक धक्कादायक अहवाल दिलाय.

Omkar Sonawane

आपल्या देशात मासे खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. सुरमई, पापलेट, कोळंबी, बोंबील अशी नावं जरी घेतली तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र हेच माझे तुमच्या ताटातून गायब होऊ शकतात.

स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज येथील एका नवीन संशोधनानं गंभीर इशारा दिलाय. जगातील अनेक किनारी भाग पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीने आम्लधर्मी म्हणजेच ॲसिडिक होत आहेत..त्याचा परिणाम समुद्रातल्या जीवसृष्टीवर होऊ शकतो.

नेचर कम्युनिकेशन्समधील प्रकाशित अभ्यासानुसार, समुद्राचं पाणी सातत्याने प्रदूषित होतंय. कॅलिफोर्नियासारख्या क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. संशोधकांनी 20व्या शतकातील कोरल नमुन्यांचा बोरोन आइसोटोप वापरून अभ्यास केला. या अभ्यासात किनाऱ्यावरील पाण्याच्या पीएच पातळीत मागील सतत घट झाली आहे असून 21व्या शतकात ही घट आणखी वेगाने होण्याची चिन्हे आहेत. हा बदल जगभरातील सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे.

पृथ्वीवरील सर्वाधिक उत्पादन देणारं क्षेत्र म्हणून मासेमारी क्षेत्र ओळखलं जातं. मात्र जेव्हा हे खोल आणि आम्लधर्मी पाणी वारंवार पृष्ठभागावर येतं आणि त्याचा सम्पर्क कार्बन डायऑक्साइडशी येतो. त्यामुळे हे पाणी ॲसिडिक होतं. तेव्हा मासे, कोळंबी, शिंपले आणि प्रवाळ यांसारखे समुद्री जीव वेगाने नष्ट होऊ लागतात. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड समुद्राच्या पाण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विरघळतय. ज्यामुळे पाण्याचा पीएच सतत कमी होतोय.

हे असंच सुरू राहिलं तर समुद्रातील जीवसृष्टी धोक्यात येईल. माशांचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे निसर्गचक्र अबाधित ठेवायचं असेल तर प्रत्येकानं वैयक्तिक जबाबदारी समजून हे प्रदूषण रोखण्यासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे.

तुमच्या ताटातील मासे गायब होणार?

'समद्राचं पाणी होतंय विषारी'

संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

नेचर कम्युनिकेशन्समधील अभ्यासानुसार, समुद्राचं पाणी सातत्याने प्रदूषित होतंय

कॅलिफोर्नियासारख्या क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया अधिक वेगवान

20व्या शतकातील कोरल नमुन्यांचा बोरोन आइसोटोप वापरून अभ्यास

किनाऱ्यावरील पाण्याच्या पीएच पातळीत सातत्याने घट

21व्या शतकात ही घट आणखी वेगाने होण्याची शक्यता

जगभरातील सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Zunka Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर झटपट बनवा मेथीचा झुणका, सोपी आहे रेसिपी

नागपूरमध्ये आमदारांना धमक्यांचं सत्र; खोपडेंनंतर राऊतांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

Maharashtra Tourism: बोरीवलीपासून अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन; या विकेंडला स्वस्तात मस्त प्लॅन करा

Neha Malik: उफ्फ तेरी अदा! नेहा मलिकच्या फोटोने सोशल मीडियावर लावली आग

Maharashtra Live News Update: यवतमाळ येथील अवधूतवाडी ठाणेदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT