Nipah virus symptoms saam tv
देश विदेश

Nipah virus: निपाह व्हायरसमुळे एका नर्सचा मृत्यू; वाचा किती धोकादायक आहे हा विषाणू? कशी घ्याल काळजी

Nipah virus symptoms: निपाह व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता त्याची लक्षणं, संसर्ग कसा पसरतो आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर आणि सोपी माहिती जाणून घ्या. स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण कसे करावे ते वाचा.

Surabhi Jayashree Jagdish

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय. परगणा जिल्ह्यातील बारासतमधील एका खाजगी रुग्णालयात २५ वर्षीय नसर्चा निपाह विषाणूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. राज्यात निपाह विषाणूमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नर्सची प्रकृती फारच गंभीर होती. प्रकृती गंभीर होती. तिची निपाह व्हायरसची टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र तिची प्रकृती सतत खालावत जात असल्याचं लक्षात आलं. तिला बराच काळ सीसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. बुधवारी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होतं. अखेरीस गुरुवारी दुपारी ४ वाजता तिचा मृत्यू झाला.

२ लोकांना झालेलं निपाहचं इन्फेक्शन

दोन नर्सिंग स्टाफला देखील व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दोघांनाही बारासतमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जानेवारीमध्ये, एक पुरुष (ब्रदर) पूर्णपणे बरा झाला आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु नर्सची प्रकृती सुधारली नाही आणि ती रुग्णालयात दाखल होती.

निपाह व्हायरस हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो आणि तो खूप धोकादायक मानला जातो. हा व्हायरस इन्फेक्टेड व्यक्तीच्या थुंकी, लाळ यांच्या संपर्कातून पसरू शकतो. निपाह व्हायरसच्या संसर्गाच्या घटनांनंतर, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर सारख्या आशियाई देशांनी विमानतळांवर तपासणी वाढवण्यात आली आहे.

निपाह विषाणू हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा व्हायरस आहे आहे. तो हेंद्रा व्हायरसशी संबंधित असून फळं खाणाऱ्या वटवाघळांच्या लाळ, लघवी किंवा विष्ठेद्वारे मानवांमध्ये पसरतो. हा व्हायरस COVID-19 सारख्या श्वसन रोगांइतक्या वेगाने पसरत नाही. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर ४ ते २१ दिवसांनी लक्षणं दिसून येतात.

निपाह व्हायरसपासून स्वतःची काळजी कशी घ्याल?

निपाहवर प्रामुख्याने योग्य काळजी घेऊन उपचार करता येतात. यामध्ये रीहायड्रेशन, ऑक्सिजनेशन, व्हेंटिलेटरचा वापर आणि औषधं यांचा समावेश आहे. रिबाविरिन आणि रेमडेसिव्हिर सारख्या औषधांच्या टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे झाडावरची कुरतडलेली फळं खाऊ नका. घरी शिजवलेलं अन्न खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT