BBC Documentary, Delhi University  ANI
देश विदेश

BBC Documentary : बीबीसी डॉक्युमेंट्रीवरून दिल्ली विद्यापीठात गोंधळ; कलम 144 लागू

BBC Documentary : दिल्ली विद्यापीठातही या डॉक्युमेंट्रीवरून जोरदार गोंधळ झाला. एनएसयूआय आणि केएसयू या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनिंगचं आयोजन केले होते.

Shivaji Kale

BBC Modi Documentary : बीबीसी डॉक्युमेंट्रीवरून सध्या वाद उफाळून आला आहे. हा वाद आता देशभरातील विद्यापीठांमध्ये ठाण मांडून बसला आहे. दिल्ली विद्यापीठातही या डॉक्युमेंट्रीवरून जोरदार गोंधळ झाला. एनएसयूआय आणि केएसयू या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनिंगचं आयोजन केले होते. मात्र, विद्यापीठ प्रशासनानं स्क्रीनिंगला मनाई केली.  (Latest Marathi News)

सरकारनं BBC डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातली आहे. मात्र, या डॉक्युमेंट्रीवरून सुरू झालेला वाद कायम आहे. दिल्ली विद्यापीठात मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. दिल्ली विद्यापीठातील कॉंग्रेसचं संघटन असलेल्या एनएसयूआय (National Student Union of India) या संघटनेने, तसंच KSU च्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग करण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रशासनाने या स्क्रीनिंगला विरोध केला.

प्रशासनाने विरोध केला म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांविरोधातही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

दिल्ली विद्यापीठाआधी जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग करण्याचं नियोजन केले होते. परंतु या दोन्ही विद्यापीठांमध्ये प्रशासनाने ही डॉक्युमेंट्री दाखवू दिली नाही. जेएनयूमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आपापल्या स्तरावर हा माहितीपट त्यांच्या फोन आणि लॅपटॉपवर पाहिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT