UP : 'तुरुंग किंवा मरण'; CM योगींच्या इशाऱ्यामुळे कुख्यात गुंड करतायत आत्मसमर्पण SaamTV
देश विदेश

UP : 'तुरुंग किंवा मरण'; CM योगींच्या इशाऱ्यामुळे कुख्यात गुंड करतायत आत्मसमर्पण

उत्तर प्रदेशमधील वाढत्या गुन्हेगारीवरती भाष्य करताना योगींनी गुन्हेगारांना चेतावणी दिली. गुन्हेगारांनी स्वत:हून तुरुंगात जाव म्हणजे आत्मसमर्पण करावं अन्यथा मरण स्विकारावं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी कैरानामधील जाहीर सभेत वाढत्या उत्तर प्रदेशमधील (UP) वाढत्या गुन्हेगारीवरती भाष्य करताना गुन्हेगारांना चेतावणी दिली असून गुन्हेगारांनी स्वत:हून तुरुंगात In Jail जाव म्हणजे आत्मसमर्पण करावं अन्यथा मरण स्विकाराव असा पर्याय दिला होता.

हे देखील पहा -

योगींच्या या वक्तव्यानंतर, बुधवारी कैराना येथील गुन्हेगार असनारा फुरकानने Fukaran न्यायालयासमोर स्वत:हून आत्मसमर्पण केल्याची घटना घडली आहे. तसेच कुख्यात गुंड सुशील मिशी याने देखील स्वत:हून आत्मसमर्पण केल्याची घटना घडल्याने योगींच्या या भाषणाचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे.

योगी सरकारच्या कारवाईचा धसका -

युपी सरकारने (UP Government) सातत्याने माफियांवरती कारवाई करण्याचा धडाकाच लावला आहे. माफियांना अटक करून त्यांच्या बेकायदेशीर संपत्तीवरती बुलडोझर चालवले जात आहेत. शिवाय सरकार अवैध मालमत्ता ताब्यात घेत आहे. माफियांना तुरुंगात पाठवले जात आहेच शिवाय काही गुंडांना चकमकीत मारले जात आहे. त्यामुळे सरकारकडून होत असलेल्या कारवाईचा धसका घेत उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी विश्व चांगलच हादरलं आहे. त्यामुळे स्वत:हून पोलिंसाकडे आत्मसमर्पण करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

माफियांना साथ देणारे पोलिसांच्या रडारवर

सहारनपूर विभागाचे DIG डॉ. प्रीतींदर सिंग यांनी सांगितले की, सुशील मिशा आणि फुरकान यांनी कारवाईच्या भीतीने आत्मसमर्पण केले असून त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच इतर बेनामी संपत्तीची चौकशी (Anonymous Assets Inquiry) देखील सुरू आहे. दरम्यान कुख्यात सुशील मिशा आणि फुरकान यांचा मोठा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे यांना आश्रय देणारे आणि त्यांना सहकार्य करणारे इतर लोकं देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचीही ओळख पटवून त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याचेही सिंग यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

SCROLL FOR NEXT