31 जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करावेत
31 जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करावेत Twitter/ @ANI
देश विदेश

31 जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करावेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरातील सर्व राज्य शिक्षण मंडळांच्या State Board of Education मूल्यांकनासाठी Evaluation एकसारखी योजना असू शकत नाही. असे निरीक्षण नोंदवत बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court असा आदेश देण्यास नकार दिला आहे. प्रत्येक बोर्ड स्वायत्त व स्वतंत्र आहे. म्हणून, न्यायालय त्यांना समान योजना अवलंबण्याचा निर्देश देऊ शकत नाही.

प्रत्येक मंडळाने आपला आराखडा तयार करावा

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठसमोर ही सुनावणी पर पडली. आम्ही संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी योजना तयार करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. प्रत्येक मंडळाला स्वतःची योजना तयार करायची आहे. त्यांना याबद्दल बरेच काही माहित आहे आणि त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ आहेत.

सर्व शिक्षण बोर्डानी 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर करावा

सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळाला आजपासून दहा दिवसांच्या आत मुल्यांकन योजनेची अधिसूचना द्यावी व अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह सीबीएसई आणि आयसीएसई सारख्या निर्दिष्ट टाइमलाइन बनविण्यास सांगण्यात आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?|Ravindra Dhangekar

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड

Varanasi: नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालून शुभेच्छा कुणी दिल्या? Video समोर!

Ramdev Baba : रामदेव बांबांचा सुप्रीम कोर्टाला नमस्कार, कोर्टही म्हणालं, आमचाही प्रणाम! पण...

होर्डिंग दुर्घटनेत १४ बळी गेल्यानंतर BMC प्रशासन खडबडून जागं, बेकायदा होर्डिंग हटवण्यास सुरुवात| Ghatkopar Hoarding collapse

SCROLL FOR NEXT