Norovirus : केरळमध्ये कोरोनानंतर आता नोराव्हायरसचं संकट ... Saam Tv
देश विदेश

Norovirus : केरळमध्ये कोरोनानंतर आता नोराव्हायरसचं संकट ...

नोरोव्हायरस' या विषाणूने केरळ मध्ये चांगलेच थैमान घातले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : 'नोरोव्हायरस' या विषाणूने केरळ मध्ये चांगलेच थैमान घातले आहे. 'नोरोव्हायरस' या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला उलट्या आणि जुलाबाची समस्या उदभवत असते. परंतु ती व्यक्ती काही दिवसामध्येच बरी होते. साधारणपणे, या विषाणूच्या संसर्गाची काही प्रकरणे हिवाळ्यात दिसत असतात. हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरत असतो.

नोरोव्हायरस सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कामधून पसरत असतो. सध्या केरळमध्ये या विषाणूची बाधा असलेले रुग्ण आढळून येत आहेत. केरळ सरकार पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता पाण्यात अधिक क्लोरीन मिसळत आहे. खरं तर हा संसर्ग जीवघेणा नाही, परंतु मुले आणि वृद्धांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या संसर्गामुळे अति उलट्या आणि जुलाबामुळे त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते.

हे देखील पहा-

या विषाणूशी लढण्याकरिता रुग्णाला कोणत्याही प्रकारचे विशेष औषध दिले जात नाही. केरळच्या आरोग्य मंत्रालयाने त्याच्या उपचाराकरिता प्रोटोकॉल जारी करण्यात आला आहे. यानुसार नोरोव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीने घरीच विश्रांती करावे. ओआरएस आणि उकळून पाणी प्यावे. लोकांनी अन्न खाण्याअगोदर आणि शौचास गेल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ आणि चांगले धुवावेत. जे लोक सामान्यतः प्राण्यांच्या संपर्कामध्ये असतात त्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगणे अतिशय आवश्यक आहे.

हा विषाणू पहिल्यांदा अमेरिकेमध्ये सापडला आहे. संक्रमित वस्तू गिळल्यामुळे विषाणू मानवी शरीरामध्ये पोहोचत असतो. या विषाणूचा उगम अमेरिकेतून झाला आहे. अमेरिकेमध्ये या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे खूप जास्त प्रमाणात आहेत. परंतु, तो प्राणघातक मानला जात नाही. बहुतेक वेळा या विषाणूचा प्रसार तिकडे रेस्टॉरंट्स मधून होत आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये नोरोव्हायरसचे रुग्ण सापडले आहेत.

केरळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार की, लोकांना या संसर्गजन्य विषाणूपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याच्या संसर्गाने पीडितेला उलट्या आणि जुलाब सुरू होतात. २ आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्यात मधील विथिरीजवळील पुकोडे या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयात सुमारे १३ विद्यार्थ्यांना दुर्मिळ नोरोव्हायरस संसर्गाची नोंद झाली होती.आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

व्हायरसचा आणखी प्रसार झाल्याचे वृत्त देखील नाही. ते म्हणाले की, प्रतिबंधात्मक उपायांचा एक भाग म्हणून जनजागृती वर्ग आयोजित करण्याबरोबरच पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या माहितीचे संकलन देखील तयार करत आहेत. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पसच्या बाहेर वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग पहिल्यांदा आढळला होता.

आरोग्य अधिकार्‍यांनी त्वरीत नमुने गोळा करण्यात आले आणि ते अलाप्पुझा या ठिकाणी असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV मध्ये तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यांनी वायनाड मधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. मंत्र्यांनी अधिका-यांना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता उपक्रम अधिक तीव्र करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहे. सध्या काळजी करण्यासारखे काही नसून सर्वांनी सावध राहावे, असे सांगण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT