non veg food ban Saam tv
देश विदेश

ऐतिहासिक निर्णय, नॉनव्हेज खाण्यावर बंदी; हॉटेल-दुकानातही चिकन, मटण मिळणार नाही, कोणत्या शहरात मनाई?

non veg food ban : गुजरातच्या पालीतानामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.पालीतानामध्ये हॉटेल-दुकानात मांसाहारी पदार्थ मिळणार नाही.

Vishal Gangurde

पालीतानामध्ये मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आलीये

शहरात चिकन, मटण दुकानात विक्री बंद करण्यात आली आहे

जैन समाजाच्या मागणीनंतर ऐतिहासिक निर्णय

देशभरात विविध राज्यातील शहरातील लोक नॉनव्हेज जेवणावर ताव मारताना हमखास दिसतात. एखाद्या कार्यक्रमात नॉनव्हेज जेवण असेल, तर लोक आवर्जुन जातात. परंतु एका शहराने मासांहाराबाबत घेतलेल्या निर्णयाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका प्रसिद्ध शहराने मासांहारी जेवण करण्यावर बंदी घातली आहे. गुजरातच्या पालीताना शहरात आता मांसाहारी पदार्थांच्या विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालीताना शहराने ऐतिहासिक निर्णय घेत मासांहारी पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे. या निर्णयानंतर चिकन,मटणाची दुकाने बंद करण्यात आली आहे. पालीताना शहरात जैन समाजाचं पवित्र स्थळ आहे. या शहरातील जैन समाजाच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

धार्मिक श्रद्धेमुळे नव्हे, तर शहराची ओळख आणि आध्यात्मिक पावित्र्य जपण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. गुजरात सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता निर्णयानुसार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पालीताना शहरात जैन धर्मियांची शेकडो मंदिरे आहेत. जैन धर्मीय शाकाहारी जीवनशैलीला प्रोत्साहन देतात. याच पार्श्वभूमीवर पालितानामध्ये मांसाहारी पदार्थाच्या सेवनावर बंदी घालण्यात आली आहे.

खरंतर भारतातील अनेक लोक चिकन, मटण, मासे आणि अंडी आवडीने खाणे पसंत करतात. भारतातील आता काही शहरात मांसाहारी पदार्थ खाण्यासंबंधित कडक नियम जारी केले आहेत. त्यामुळे गुजरात किंवा इतर धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाताना आहाराच्या सेवनाचे नियम जाणून घ्यायला विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT