Model Dies During Fashion Show saam tv
देश विदेश

Noida Lighting Truss Falls: फॅशन शोदरम्यान लाइटिंगचा ट्रस पडल्याने मॉडेलचा मृत्यू, फिल्मसिटीमध्ये घडली घटना

Model Dies During Fashion Show : शोचे आयोजक आणि लाइटिंग ट्रसच्या मालकाची पोलीस चौकशी करत आहेत.

Chandrakant Jagtap

Model Dies After Lighting Truss Falls: उत्तर प्रदेशच्य नोएडा येथे एका फॅशन शोदरम्यान लाइटिंग ट्रस पडल्याने २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. नोएडातील फिल्म सिटी सेक्टर-20 पोलीस स्टेशन परिसरातील लक्ष्मी स्टुडिओमध्ये रविवारी ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शोचे आयोजक आणि लाइटिंग ट्रसच्या मालकाची पोलीस चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास नोएडा सेक्टर 20 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका स्टुडिओमध्ये फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोदरम्यान अचानक लाइटिंग ट्रस खाली पडला आणि एक मॉडेल आणि एक तरुण त्याच्या कचाट्यात आले. हा ट्रेस इतक्या वेगाने पडला की 24 वर्षीय मॉडेल वंशिका चोप्राचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मृत मॉडेल वंशिका ही गौर सिटी-२ नोएडा येथील रहिवासी आहे, तर जखमी तरुण बॉबी राजचा मुलगा राज कुमार हा गोपाल पुरा, ग्वाल्हेर रोड, आग्रा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. यासोबतच तिच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे. (Breaking News)

एडीसीपी नोएडा शक्ती अवस्थी यांनी सांगितले की, या प्रकरणी 4 आयोजकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना घटनेविषयी माहिती देण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात फॅशन शोचे आयोजक आणि लाइटिंग ट्रस्ट बसवणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या दिवशी करा 'हे' हळदीचे खास उपाय

IndW vs SAW Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वर्ल्डकप फायनल लाइव्ह कुठे बघाल फ्री? वाचा

Gauri Kulkarni: गोऱ्या गोऱ्या रंगाची 'ही' अभिनेत्री कोण?

Maharashtra Live News Update : मनमाड परिसरात जोरदार पावसाची हजेरी

Thane To Amravati: ठाणेहून अमरावतीला कसे पोहोचाल? 'या' मार्गांचा वापर करून करा आरामदायी प्रवास

SCROLL FOR NEXT