...म्हणून मलाला युसुफझाईने केले लग्न; फोटो शेअर करत दिली माहिती Twitter
देश विदेश

...म्हणून मलाला युसुफझाईने केले लग्न; फोटो शेअर करत दिली माहिती

दोघांचे लग्न युनायटेड किंगडममधील बर्मिंगहॅम येथे झाले आहे.

वृत्तसंस्था

नोबेल शांतता पुरस्कार विजेती आणि कार्यकर्त्या मलाला युसुफझाईचे मंगळवारी लग्न झाले. २४ वर्षीय मलालाने तिच्या लग्नाचे फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले की, तिने असर मलिकसोबत एका छोट्याशा समारंभात कुटुंबासह लग्न केले. असर मलिक हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचे महाव्यवस्थापक आहेत. दोघांचे लग्न युनायटेड किंगडममधील बर्मिंगहॅम येथे झाले आहे.

लग्नाचे फोटो शेअर करत मलालाने मंगळवारी लिहिले, “आज माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी लाइफ पार्टनर बनण्याची गाठ बांधली आहे. बर्मिंगहॅममध्ये आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत एक छोटा निकाह सोहळा आयोजित केला होता. आम्हाला तुमच्या शुभेच्छा द्या. आम्ही पुढील प्रवास एकत्र करण्यास उत्सुक आहोत.”

पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाची वकिली करणाऱ्या मलाला युसुफझाईला दडपण्यासाठी २०१२ मध्ये तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शाळेतून घरी परतणाऱ्या मलालावर झालेला हा हल्ला जीवघेणा होता. ब्रिटनमध्ये प्रदीर्घ उपचारानंतर ती बरी झाली आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. मलाला ही नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे.

लग्नाची घोषणा केली अन् धमकी आली.

या वर्षी जूनमध्ये मलाला युसूफझाईने लग्नाबाबत टिप्पणी केली होती, त्यानंतर तिला आत्मघातकी हल्ल्यात जीवे मारण्याच्या आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत युसुफझाई म्हणाली की ती कधी लग्न करेल की नाही याची मला खात्री नव्हती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सप्तशृंगी देवीचे दर्शन १२ वाजेपर्यंत खुलं राहणार

Chia Seeds Ladoo Recipe: दिवाळी सणात गोड आणि हेल्दी राहण्यासाठी बनवा चिया सीड्स लाडू, वाचा सोपी रेसिपी

Sanjay Raut: भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण? हे नाटक कोणत्या साली आले? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला|VIDEO

Heart Attack Risk: सावधान! फिटनेसच्या नादात घेताय सप्लिमेंट्स? वाढेल स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका

Bigg Boss 19: एडल्ट टॉयजचा बिझनेस करते तान्या...; बिस बॉसच्या घरात मिलतीने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT