Narges Mohammadi Saam tv
देश विदेश

Narges Mohammadi: १३ वेळा अटक, ८ वर्षांपासून मुलींना भेटल्या नाही; शांततेचा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या नरगिस मोहम्मदी आहे तरी कोण?

Narges Mohammadi: जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणारा शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे.

Vishal Gangurde

Narges Mohammadi News:

जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणारा शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. इराणमधील महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नरगिस मोहम्मदी या इराणच्या महिला पत्रकार आहेत. (Latest Marathi News)

कोण आहे नरगिस मोहम्मदी?

नरगिस यांचा जन्म कुर्दिस्तान इराणच्या जंजन शहरात २१ एप्रिल १९७२ मध्ये झाला. नोबेलच्या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, नरगिस मोहम्मदी या मानवधिकार कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटर या संस्थेच्या उपप्रमुख आहेत.

नरगिस यांना महिलासाठी संघर्ष करताना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. इराणने त्यांना १३ वेळा अटक केली आहे. त्यांना पाच वेळा दोषी ठरवलं आहे.

नरगिस यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनियर म्हणून काम केलं. नरगिस या स्तंभलेखक देखील आहेत. अनेक वृत्तपत्रासाठी लिखाणाचं काम केलं आहे. नरगिस यांनी १९९० साली महिलांच्या हक्कासाठी आवाज उचलला.

पुस्तकांना मिळाले आहेत अनेक पुरस्कार

नरगिस यांनी सामाजिक सुधारणांसाठी अनेक लेख लिहिले आहेत. नरगिस यांनी 'व्हाइट टॉर्चर' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. नरगिस यांनी या पुस्तकात तुरुंगातील आपले अनुभव आणि इतर कैद्यांच्या कथा लिहिल्या आहेत.

नरगिस या नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या १९ व्या महिला आहेत. शिरीन एबादी यांच्या पुरस्कार जिंकणाऱ्या दुसऱ्या इराणच्या महिला ठरल्या आहेत.

८ वर्षांपासून मुलांची झाली नाही भेट

नरगिस मोहम्मदी यांची गेल्या ८ वर्षांपासून त्यांच्या लहान मुलांना बघितलं देखील नाही. त्यांना जुळे मुली आहेत. अली आणि कियाना असं दोघींची नावे आहेत. त्यांच्या दोन्ही मुली या वडील तागी रहमानी यांच्यासोबत फ्रान्समध्ये राहतात. 51वर्षांच्या नरगिस या अजूनही इराणमधील तुरुंगात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: साताऱ्यातील राजवाडा येथे जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेवर होणार पालिकेची अद्यावत तीन मजली इमारत

लढवय्या कम्युनिस्टचा प्रवास थांबला! माजी मुख्यमंत्र्यांचं वयाच्या १०१व्या वर्षी निधन, राजकारणात मोठी पोकळी

Manikrao Kokate: रम्मीचा डाव उलटणार; माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार? VIDEO

Lip Filler: सिलिब्रिटी लिप फिलर्स करतात म्हणजे नेमंक काय करतात?

Maharashtra Politics : राज ठाकरे - उद्धव ठाकरे इतक्यात एकत्र येतील का? काय आहेत आव्हानं? EXPLAINED

SCROLL FOR NEXT