Live In Relationship SaamTv
देश विदेश

घटस्फोटाआधीच लिव्ह इन रिलेशनला पोलीस संरक्षण नाही राजस्थान उच्च न्यायालयाचा निकाल

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील या ३० वर्षीय महिलेने आणि तिच्या २७ वर्षीय प्रियकराने एकत्रितरित्या याचिका दाखल करत न्यायालयाकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.

विहंग ठाकूर

राजस्थान : राजस्थान उच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात विवाहित महिला आणि तिचा प्रियकर यांना पोलीस संरक्षण नाकारले आहे. वास्तविक, ही महिला दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील या ३० वर्षीय महिलेने आणि तिच्या २७ वर्षीय प्रियकराने एकत्रितरित्या दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून, काही नातेवाईकांकडून जीवास धोका असून जिवेमारण्याच्या धमक्या देखील देण्यात येत असल्याच्या सबबीखाली पोलिस संरक्षण मागितले होते.

हे देखील पहा -

कोर्टात सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करत म्हटले कि, दोघेही प्रौढ असून परंपर सहमतीने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. सदर महिला विवाहित आहे. मात्र, तिच्या पतीकडून अत्यंत क्रूर वागणूक आणि छळ या महिलेला होत असल्याने ती पतीपासून दूर राहत आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाने इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अश्याच एका प्रकरणातील निर्णयाचा हवाला देत म्हटले कि, इलाहाबाद उच्च न्यायालयाने देखील एका प्रकरणात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेस संरक्षण देण्यास नकार दिला होता. या प्रकरणात देखील, सदर महिला आधीच विवाहित होती आणि दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती, जे हिंदू विवाह कायद्याच्या तरतुदीच्या विरुद्ध आहे. न्यायालयाने म्हटले की, अशा लोकांचे संरक्षण करण्याचे आदेश देऊ शकत नाही, ज्यांनी दंड संहिता आणि हिंदू विवाह कायद्याचे उघडपणे उल्लंघन केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ६ लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; आदिती तटकरेंनी कारणच सांगितलं

Liver Health : फॅट लॉस ते लिव्हर Detox; 'ही' कॉफी रोज प्या, तब्येत राहिल फिट, सगळे आजार छुमंतर

Buldhana : लोणार सरोवराच्या पाण्यात निर्माण झाली सजीव सृष्टी, पर्यावरणासह मानवलाही धोका?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे यांचा घातपाताचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Overthinking : तुम्हीपण खूप Overthinking करताय? मग 'या' सिक्रेट टिप्स आहेत तुमच्या फायद्याच्या, माईंड होईल रिलॅक्स

SCROLL FOR NEXT