AMit Shah- Adhir Ranjan Chaudhari Saam TV
देश विदेश

No Confidence Motion : राजा आंधळा असल्यास द्रौपदीचं वस्त्रहरण होतं, काँग्रेस खासदाराच्या वक्तव्याने अमित शाह ताडकन उठले, अन्...

Avishwas Prastav : पंतप्रधान मोदी देशाचे प्रमुख असल्याने त्यांनी मणिपूरच्या लोकांसमोर आपले विचार मांडायला हवे होते.

प्रविण वाकचौरे

No Confidence Motion : मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांना आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सलग तिसऱ्या दिवशी चर्चा सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहात यावर उत्तर देणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे खासदार अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका केली.

पंतप्रधान मोदी देशाचे प्रमुख असल्याने त्यांनी मणिपूरच्या लोकांसमोर आपले विचार मांडायला हवे होते. ही मागणी चुकीची मागणी नव्हती. ही सर्वसामान्यांची मागणी होती.

आम्ही पंतप्रधानांना सभागृहात खेचून आणलं

अविश्वास ठरावाची ताकद बघा, आम्ही पंतप्रधान मोदींना सभागृहात खेचून आणलं आहे. संसदीय परंपरेचे ही ताकद आहे. मणिपूरवरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी सभागृहात न येण्याची शपथ का घेतली होती, माहीत नाही. अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आम्ही यापूर्वी विचार केला नव्हता, परंतु आम्हाला आणावा लागला, असंही चौधरी यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

अधीर रंजन पुढे म्हणाले की, जिथे राजा आंधळा असतो, तिथे द्रौपदीचं वस्त्रहरण होतं. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, तुम्ही पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारे सभागृहात बोलू शकत नाही.

यावर अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, आम्हाला असे म्हणायचे आहे की पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीत काहीतरी बोलतात. पण मणिपूरबाबत ते गप्प आहेत. आम्हाला ते अजिबात आवडत नाही. मणिपूरमधून दोन खासदार आहेत. त्यांना बोलण्याची संधी देता येत नाही.

मोदींची नीरव मोदींशी तुलना

नीरव मोदी परदेशात फिरत राहतो, त्याचे फोटो येत राहतात. आम्हाला वाटले की नीरव मोदी परदेशात गेला. मात्र नरेंद्र मोदींमध्ये नीरव मोदी दिसतोय, असं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं. त्यानंतर सत्ताधाऱ्यांना सभागृहात गदारोळ सुरु केला. अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT