siddaramaiah and dk shivakumar saam tv
देश विदेश

Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

karnataka cm change decision kharge final : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेनं देशाच्या राजकारणात उठलेली वावटळ काँग्रेस अध्यक्षांच्या निर्णयानं अचानक शांत झाली. बऱ्याच काळापासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Nandkumar Joshi

कर्नाटकात मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री बदल्याच्या चर्चांनी उठलेलं वादळ अखेर शांत झालंय. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार का, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत फायनल निर्णय घेतलाय. कर्नाटकात सध्यातरी मुख्यमंत्री बदलणार नाहीत. जे त्या पदावर आहेत, तेच कायम राहतील, असं खरगे यांनी स्पष्ट केलंय.

कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेनं राज्यासह देशातील राजकारणात खळबळ उडाली होती. त्यात उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केलेल्या वक्तव्यामुळं सस्पेन्स निर्माण झाला होता. ते स्वतः आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यातील नेतृत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस हायकमांडकडून घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचं पालन करतील, असे शिवकुमार म्हणाले होते. दिल्लीहून परतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांशी संवाद साधला होता. पक्षनेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले होते.

कर्नाटकातील राजकीय वर्तुळात ४ मे नंतर संभाव्य नेतृत्व बदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनंतर डीके शिवकुमार यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. दुसरीकडे ४ मे रोजी चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि कर्नाटकातील दोन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल घोषित होणार होते. त्यात शिवकुमार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यात काँग्रेस हायकमांडसोबत झालेल्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सूचक विधान केले होते. प्रसारमाध्यमांसमोर मी राजकीय मुद्द्यांवर बोलणार नाही. जेव्हा वेळ येईल, त्यावेळी त्यावर बोलणार असल्याचे शिवकुमार म्हणाले होते.

पक्षांतर्गत मतभेद नाहीत

डीके शिवकुमार यांनी पक्षांतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळली होती. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. जे निर्णय घेण्यात आले आहेत, त्यानुसारच त्याची अंमलबजावणी होईल, असे ते म्हणाले होते. ज्येष्ठ मंत्री सतीश जारकीहोली यांच्यासोबत मतभेद असल्यासंबंधीच्या कथित वक्तव्यावर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. आमच्यात असं काही नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. कोणतेही मतभेद नाहीत. पक्षनेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. ते निर्णय घेतील, असे शिवकुमार म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध

Pune : गस्त घालताना निर्जन स्थळी टेम्पो आढळला, चौकशी करताच... पुणे पोलिसांची मोठी कारवाई, काय सापडलं?

Maharashtra News Live Update : नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

Tendli Bhat Recipe: महाराष्ट्रीयन पद्धतीचा तोंडली भात कसा बनवायचा?

Watermelon Side Effects: कलिंगड खाल्ल्यानंतर हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, थेट हॉस्पीटलमध्ये भरती व्हाल

SCROLL FOR NEXT